बंगळुरू - दिवाळीच्या दोनच दिवसात भारतीयांनी चिनी कंपनी असलेल्या शाओमीचे १ कोटी २० लाख उत्पादने खरेदी केले आहेत. यामध्ये टीव्ही व स्मार्टफोन अशा उत्पदानांचा समावेश आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कंपनीने ४० टक्के विक्री वृद्धी अनुभवली आहे.
शाओमी इंडियाच्या ऑनलाईन सेलचे प्रमुख रघु रेड्डी म्हणाले, सण हा नेहमीच शाओमीसाठी विक्रीचा हंगाम राहिलेला आहे. एमआय चाहत्यांनी सण आनंदाने साजरा करावा, यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे.
हेही वाचा-व्होडाफोन भारतामधून गाशा गुंडाळणार?
शाओमीच्या ८.५ दशलक्ष स्मार्टफोनची विक्री झाली आहे. रेडमी नोट ७ सिरीज या स्मार्टफोनची सर्वात अधिक विक्री झाली आहे. तर सहा लाख एमआय टीव्हीची विक्री झाली आहे. अपेक्षेहून चांगली विक्री झाल्याचेही त्यांनी सांगितले. शिओमीच्या उत्पादनात एमआयटीव्ही, एमआय इकोसिस्टिम आणि अॅसेसरी उत्पादनाचा समावेश आहे.