ETV Bharat / business

‘जिओबरोबरील फेसबुकची भागीदारी ही भारतामधील लघू व्यवसायांसाठी मोठी संधी’ - Facebook CEO Mark Zuckerberg

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी विश्लेषकांशी गुरुवारी संवाद साधला. यावेळी बोलताना मार्क म्हणाले, की जगात विशेषत: भारतात खूप लोक व्हॉट्सअ‌ॅपचा वापर करतात. भारतामध्ये असलेल्या मोठ्या संधीबाबत खरोखरच उत्साह वाटत आहे.

संग्रहित
संग्रहित
author img

By

Published : Jul 31, 2020, 2:01 PM IST

नवी दिल्ली – फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी भारतामधील 400 दशलक्ष वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअप पे लाँच करण्यासाठी पुन्हा एकदा वचनबद्धता व्यक्त केली आहे. रिलायन्स जिओबरोबरील भागीदारी ही लघू व्यवसायांसाठी मोठी संधी असल्याचे झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे. व्हॉट्सअ‌ॅपच्या माध्यमातून देशातील अनेकांना खरेदी व विक्री करणे शक्य होणार असल्याचे मार्क यांनी सांगितले.

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी विश्लेषकांशी गुरुवारी संवाद साधला. यावेळी बोलताना मार्क म्हणाले, की जगात विशेषत: भारतात खूप लोक व्हॉट्सअ‌ॅपचा वापर करतात. भारतामध्ये असलेल्या मोठ्या संधीबाबत खरोखरच उत्साह वाटत आहे. जिओबरोबर आम्ही देशात व्यवसाय सिद्ध करून दाखवल्यानंतर जगभरात त्याचा विस्तार करण्याचे नियोजन करणार आहोत. समुदायाचा विचार करता भारत हा सर्वात मोठा देश आहे. भारतात व्यवसायांना विकास करण्यासाठी आणि इतर विकासाच्या सर्वाधिक संधी असणे आवश्यक आहेत.

फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअ‌ॅपने ऑनलाइन देयक व्यवहार करण्यासाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप पे’ची चाचणी घेतली आहे. मात्र, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कठोर नियमामुळे कंपनीने अद्याप 'व्हॉट्सअ‌ॅप पे'चे लाँचिग केले नाही.

जिओमार्ट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि व्हॉट्सअ‌ॅप हे लाखो लोकांना विकासाच्या संधी मिळवून देण्यासाठी काम करत असल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी नुकतेच म्हटले होते. त्यामधून लहान व्यापारी आणि किराण दुकानदारांना फायदा होईल, असे अंबानी यांनी सांगितले होते.

दरम्यान, फेसबुकने जिओमध्ये 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.