नवी दिल्ली - कोरोनाच्या लढ्याकरता फिल्पकार्ट व वॉलमार्टने ४६ कोटींची मदत करण्याचे जाहीर केले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना वैयक्तिक सुरक्षा साधने (पीपीई) आणि एनजीओला कंपनी निधी देणार आहे.
कोरोनाच्या लढ्यात आघाडीवर काम करणाऱ्यांसाठी वॉलमार्ट इंडिया आणि फ्लिपकार्ट ३८.३ कोटी रुपये खर्च करणार आहे. तर एनजीओमार्फत कंपनी आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई, एन ९५ मास्क, मेडिकल गाऊनचे वितरण करण्यात येणार आहे. वॉलमार्ट फाउंडेशनकडून गुंज आणि सृजन या एनजीओला ७.७ कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे. या एनजीओकडून कोरोनाच्या संकटात सापडलेल्या गरजूंना मदत करण्यात येते.
हेही वाचा-भारत उत्पादनाचे जागतिक हब होण्याकरता उर्जा मंत्रालयाने 'हा' घेतला निर्णय
एनजीओच्या निधीचा वापर अन्न, औषधे, स्वच्छतेची साधने यांची खरेदी करता येणार आहे. त्याचे वितरण शेतकरी, ग्रामीण भागातील जनता व लहान व्यवसायिकांमध्ये करण्यात येणार असल्याचे वॉलमार्टने म्हटले आहे.
हेही वाचा-केंद्र सरकार आणखी दिलासादायक निर्णय घेणार; आर्थिक पॅकेजची लवकरच घोषणा
यापूर्वी टाटा ट्रस्ट आणि टाटा ग्रुपने कोरोनाच्या लढ्याकरता १ हजार ५०० कोटी रुपयांची मदत करण्याचे जाहीर केले. तर विप्रोने १ हजार १२५ कोटी रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले. कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक कंपन्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत.