नवी दिल्ली - व्होडाफोन कंपनीने भारतामध्ये आणखी गुंतवणूक करणार नसल्याचे सांगत सरकारकडे अंतिम मागणी केल्याचे ब्रिटिश माध्यमांनी म्हटले आहे. गुंतवणूक थांबविल्याने मोठे नुकसान होत असतानाही व्होडाफोन भारतात घेतलेली जोखीम संपविणार आहे.
मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स जीओविरोधात स्पर्धा करण्यासाठी तरतूद करण्याची मागणी व्होडाफोनने सरकारकडे केली आहे. अन्यथा, भारतीय व्यवसायात आणखी गुंतवणूक करणार नसल्याचे व्होडाफोनने म्हटले आहे.
हेही वाचा-इन्फोसिसचे सीईओ सलिल पारेख यांच्यावर आणखी एका जागल्याचा निशाणा
ब्रिटिश माध्यमांच्या माहितीनुसार, व्होडाफोनचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक रिड यांनी व्यावहारिक हेतुसाठी भारत सरकारकडे शेवटची मागणी केली आहे. ही माहिती व्होडाफोनच्या अहवालात देण्यात आली आहे. ५ जीमध्ये मुकेश अंबानी यांच्या विरोधात स्पर्धा करण्याची परवानगी द्या, अशी व्होडाफोनने सरकारकडे मागणी केली आहे.
हेही वाचा-चिंताजनक! दुसऱ्या तिमाहीत जीडीपीचा विकासदर ४.२ टक्के ; स्टेट बँक ऑफ इंडियाचा अहवाल
व्होडाफोनने ही २००७ मध्ये भारतीय बाजारपेठेत उतरली आहे. या दरम्यान कंपनीने देशात लाखो कोटी रुपये गुंतविले आहेत. सरकारने रिलायन्स जिओच्या बाजूने अनेक धोरणात्मक निर्णय घेतल्याबद्दल व्होडाफोन नाराज असल्याचे अहवालामधून सूचित होते. व्होडाफोन ही इंग्लंडमध्येही आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे पुन्हा भारतामध्ये व्होडानफोनला गुंतवणूक करणे अवघड जाणार आहे.