नवी दिल्ली - उबेर या ऑनलाईन अॅपने रायडरचेक हे नवे फीचर्स आणले आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होणे शक्य होणार आहे.
उबेरची ओला कंपनीबरोबर तगडी स्पर्धा आहे. ओलाने यापूर्वीच ओटीपीचे फीचर्स २०१० मध्ये लाँच केले. तर ओला गार्डियन हे फीचर सप्टेंबर २०१८ मध्ये जगभरातील १६ हून अधिक शहरात लाँच केले आहे. गार्डियन या फीचरमधून मार्गातील बदल, अचानक थांबणे अशा गोष्टी ट्रॅक करता येतात. त्याप्रमाणे कंपनीचे सुरक्षा प्रतिसाद पथक (एसआरटी) हे ग्राहकांना मदत करते. उबेरच्या पिन पडताळणी फीचरमधून ग्राहकांना चार अंकी ओटीपी क्रमांक वाहन चालकाला सांगावा लागणार आहे. त्यानंतर नवे फीचर्स सेटिंगमध्ये बदल करून सुरू करता येणार आहे.
हेही वाचा-चालू आर्थिक वर्षात विकासदर ५ टक्के राहिल; जागतिक बँकेचा अंदाज
उबेरचे वरिष्ठ संचालक सचिन कन्सल म्हणाले, हे फीचर पथदर्शीतत्वावर राबविण्यात येत आहे. येत्या आठवड्यात ते फीचर वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे. त्या व्यतिरिक्त अल्ट्रासाउंड टेक्नॉलॉजीचे फीचरवर काम करण्यात येणार आहे.
हेही वाचा-सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण; जाणून घ्या किंमत