ETV Bharat / business

टीव्हीएस मोटरकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्क्यांची कपात - cut staff salaries in lockdown

दुचाकीची निर्मिती करणाऱ्या टीव्हीएस मोटरने कामगार ते अधिकाऱ्यापर्यंत सर्वांच्या वेतनात ऑक्टोबरपर्यंत कपात होणार असल्याचे म्हटले आहे. अभूतपूर्व संकट असल्याने तात्पुरत्या काळासाठी वेतन कपात होणार असल्याचे टीव्हीएस मोटरच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

टीव्हीएस मोटर कंपनी
टीव्हीएस मोटर कंपनी
author img

By

Published : May 26, 2020, 1:15 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटामुळे कंपन्यांमध्ये वेतन कपातीचे सत्र सुरू झाले आहे. टीव्हीएस मोटर कंपनीने कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्क्यापर्यंत कपात केली आहे. ही वेतन कपात 'मे'पासून सहा महिन्यापर्यंत राहिल, असे कंपनीने म्हटले आहे. कोरोनाच्या संकटामुळे कंपनीने वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

दुचाकीची निर्मिती करणाऱ्या टीव्हीएस मोटरने कामगार ते अधिकाऱ्यापर्यंत सर्वांच्या वेतनात ऑक्टोबरपर्यंत कपात होणार असल्याचे म्हटले आहे. अभूतपूर्व संकट असल्याने तात्पुरत्या काळासाठी वेतन कपात होणार असल्याचे टीव्हीएस मोटरच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

हेही वाचा-भारत फोर्जचे मुंढवासह चाकणमधील उत्पादन प्रकल्प होणार सुरू

टीव्हीएस मोटर ही दुचाकी निर्मितीत देशात तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. टाळेबंदीत नियम शिथील केल्यानंतर कंपनीने देशातील उत्पादन प्रकल्प ६ मे रोजीपासून सुरू केले आहेत.

हेही वाचा-उबेर इंडियाकडून ६०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.