ETV Bharat / business

ट्रूकॉलरकडून कोव्हिड रुग्णालयांची डिरेक्टरी लाँच - ट्रुकॉलर कोव्हिड रुग्णालय डिरेक्टरी

ट्रूकॉलर डिरेक्टरीमध्ये कोव्हिड रुग्णालयांची दूरध्वनी क्रमांक आणि पत्ते देण्यात आली आहेत. यामध्ये विविध राज्यांमधील रुग्णालयांचा समावेश आहे.

Truecaller
ट्रूकॉलर
author img

By

Published : Apr 28, 2021, 3:04 PM IST

बंगळुरू- कोरोनाच्या संकटात रुग्णासह व नातेवाईकांना कोरोनावरील उपचारासाठी रुग्णालय वेळेवर शोधणे जिकिरीचे ठरत आहे. अशा परिस्थितीत टेलिफोन सर्च इंजिन आणि कॉलर आयडी सर्व्हिस प्रोवायडर कंपनी ट्रूकॉलरने दिलासा दिला आहे. कोरोनाच्या संकटात सर्वांना उपयोगी पडेल असे रुग्णालयांची डिरेक्टरी लाँच केली आहे.

रुग्णालयांची डिरेक्टरी ही ट्रुकॉलर अॅपमध्ये उजव्या बाजूल देण्यात आहे. या डिरेक्टरीमध्ये कोव्हिड रुग्णालयांची दूरध्वनी क्रमांक आणि पत्ते देण्यात आली आहेत. यामध्ये विविध राज्यांमधील रुग्णालयांचा समावेश आहे. सरकारकडे असलेल्या डाटामधून रुग्णालयांचे पत्ते व दुरध्वनी क्रमांक देण्यात आली आहेत. ट्रूकॉलरच्या डिरेकटरीमुळे वापरकर्त्यांना नजीकच्या परिसरातील रुग्णालय शोधणे सोपे पडणार आहे.

हेही वाचा-ऑक्सिजन तुटवड्याला केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास कारणीभूत - पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.21 टक्के

कोरोनाबाबत देशात चिंता वाढत असताना राज्यासाठी मंगळवारी काहीअंशी दिलासादायक आकडेवारी आली होती. राज्यात आज 24 तासात 67 हजार 752 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत 36 लाख 69 हजार 548, रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.21 टक्के इतक आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात आज 66 हजार 358 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

हेही वाचा-शरीरातील ऑक्सिजन पातळी फक्त 57, तरीही 'ती'ने कोरोनाला हरवले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.