मुंबई - भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली हा युवावर्गात चांगलाच लोकप्रिय आहे. कोहलीच्या वन८ या ब्रँडबरोबर करार केल्याने पुमा इंडियाच्या विक्रीत १० टक्के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे बिस्किट ते वाहन उद्योग अशा सर्वच उद्योगांना मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा फटका बसत आहे. अशा स्थितीत पुमा इंडियाने व्यवसायवृद्धी अनुभवली आहे.
पुमा इंडियाच्या प्रतिस्पर्धी कंपनी नाईके आणि आदिदास पूर्वीच स्पोर्ट्सवेअरमध्ये प्रस्थापित आहेत. पुमा कंपनीने उशीरा २००६ मध्ये स्पोर्ट्सवेअरच्या बाजारपेठेत प्रवेश केेला आहे. पुमाने पहिल्यांदाच खेळाडूचा ब्रँड असलेल्या उत्पादनाबरोबर भारतात भागीदारी केली आहे. पुमा कंपनीच्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष २०१९ मध्ये विराट कोहलीच्या ब्रँडचा पुमा इंडियाच्या एकूण विक्रीत १० टक्के हिस्सा राहिला आहे.
हेही वाचा-अमेरिकेतील व्यापारावरील नियमन कमी करणार; ट्रम्प यांचे भारतीय सीईओंना आश्वासन
आदिदासने आर्थिक वर्ष २०१९ मध्ये १,२५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले. तर पुमा कंपनीने याच वर्षात १,४१३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. तर नाईक कंपनीने ८३१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.
हेही वाचा-सोने प्रति तोळा होवू शकते ४७,००० हजार रुपये - मोतीलाल ओसवाल
यावर विराट कोहली म्हणतो-
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला, की वन८ लाँच करण्यापर्यंत पुमाबरोबर भागीदारी मोठी ठरली आहे. मला पुमाबरोबर वैयक्तिक संकलन (कलेक्शन) करण्याची संधी मिळाली आहे. पुमाबरोबर अशी भागीदारी करणारा मी पहिला खेळाडू ठरलो आहे. कोहली हा पुमाचा जागतिक सदिच्छादूत (अॅम्बेसेडर) आहे.
दरम्यान, आगामी ऑलिम्पिक आणि टी २० चषक स्पर्धेमुळे विक्रीत चांगली वाढ होईल, असा कंपनीने विश्वास व्यक्त केला आहे.
हेही वाचा-शेअर बाजार खुला होतानाच ४०० अंशांनी आपटी; कोरोनाने चिंतेचे सावट