ETV Bharat / business

टीसीएस इंग्लंडमध्ये १,५०० जणांना देणार नोकऱ्या

इंग्लंडचे व्यापार सचिव लिझ ट्रस आणि टीसीएसचे सीईओ राजेश गोपीनाथन यांची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत टीसीएसने इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेत, नवसंशोधन, तंत्रज्ञान क्षेत्र आणि विकसनशील मनुष्यबळात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे.

टीसीएस
टीसीएस
author img

By

Published : Feb 10, 2021, 3:46 PM IST

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) रोजगाराबाबत मोठी घोषणा केली आहे. टीसीएस पुढील वर्षात इंग्लंडमध्ये १,५०० जणांना नोकऱ्या देणार आहे.

इंग्लंडचे व्यापार सचिव लिझ ट्रस आणि टीसीएसचे सीईओ राजेश गोपीनाथन यांची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत टीसीएसने इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेत, नवसंशोधन, तंत्रज्ञान क्षेत्र आणि विकसनशील मनुष्यबळात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे.

हेही वाचा-सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; पेट्रोल-डिझेलचे दर २५ ते ३० पैशांनी महाग

टीसीएसने इंग्लंडमधील काही मोठ्या संस्थांबरोबर त्यांच्या विकास आणि परिवर्तनासाठी करार केला आहे. त्यामधून त्यांच्या तंत्रज्ञानाची प्रगती करण्यासाठी बदल करण्यात येणार आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या टीसीएसचा गेल्या दहा वर्षात इंग्लंडमधील व्यवसाय चारपटीने वाढला आहे. टाटा ग्रुपची मालकी असलेली टीसीएसचे २२ अब्ज डॉलर भांडवली मूल्य आहे. कंपनीचे ४६ देशांमध्ये ४.६९ लाख कन्सल्टंट आहेत.

हेही वाचा-ई-कॉमर्सचा डिसेंबरच्या तिमाहीत ३६ टक्के विकासदर

अगणित संधी उपलब्ध होणार -

कोरोनानंतरच्या जगात देशासाठी अगणित संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र, त्या संधीसाठी देशाने लाभ घ्यायला हवा. कर आणि डाटासाठी नियामक संस्थेची तत्वे निश्चित करण्याची गरज आहे, असे मत टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी डिसेंबरमध्ये व्यक्त केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.