ETV Bharat / business

बायबॅक: टीसीएस १८ डिसेंबरपासून १६ हजार कोटींचे शेअर घेणार परत - TCS shareholders

टीसीएसने मागील महिन्यात 5,33,33,333 इतके शेअर परत घेण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. सेबीच्या नियमानुसार पात्र समभागधारकांचे (शेअरहोल्डर) पत्र १५ डिसेंबर २०२० पूर्वी जाहीर केले जाणार आहे. शेअरच्या सेटलमेंटसाठी शेवटची तारीख १२ जानेवारी २०२१ आहे.

टीसीएस
टीसीएस
author img

By

Published : Dec 9, 2020, 9:33 PM IST

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी टीसीएस ही १६ हजार कोटी रुपयांचे शेअरबॅक करणार आहे. ही शेअरबॅक योजना १८ डिसेंबरला सुरू होणार आहे. तर १ जानेवारी २०२१ ला संपणार आहे.

टीसीएसने मागील महिन्यात 5,33,33,333 इतके शेअर परत घेण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. सेबीच्या नियमानुसार पात्र समभागधारकांचे (शेअरहोल्डर) पत्र १५ डिसेंबर २०२० पूर्वी जाहीर केले जाणार आहे. शेअरच्या सेटलमेंटसाठी शेवटची तारीख १२ जानेवारी २०२१ आहे.

हेही वाचा-फेसबुक इंडियाच्या उत्पन्नात ४३ टक्क्यांची वाढ; नफा १३५ कोटी रुपये!

टीसीएसची स्पर्धक कंपनी विप्रोने यापूर्वी ९,५०० कोटी रुपयांचे शेअर मागे घेण्याचे जाहीर केले आहे. टीसीएसचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन म्हणाले, की कंपनी ही समभागधारकांना भांडवल परत देण्याच्या निर्णयावर लक्ष केंद्रित करत आहे. मुंबईस्थित टीसीएसकडे सप्टेंबर २०२० मध्ये ५८,५०० कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये टीसीएस संचालक मंडळाने विशेष लाभांश जाहिर केला होता.

हेही वाचा-जळगावात पेट्रोलच्या दराने ओलांडला नव्वदीचा टप्पा; डिझेल 80.51 रुपये प्रति लिटर

शेअर बाजारात तेजी

शेअर बाजाराचा निर्देशांक ४९५ अंशाने वधारून पहिल्यांदाच आज ४६,००० चा टप्पा ओलांडला आहे. विदेशी गुंतवणूकदारांचा ओघ आणि जागतिक बाजारातील सकारात्मक स्थिती या कारणांनी शेअर बाजारात तेजी निर्माण झाली आहे.

मुंबई शेअर बाजाराने आज दिवसभरात ४६,१६४.१० हा आजवरचा उच्चांक नोंदविला आहे. दिवसाखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ४९४.९९ अंशाने वधारून ४६,१०३.५० वर स्थिरावला. निफ्टीचा निर्देशांक १३६.१५ अंशाने वधारून १३,५९.१० वर स्थिरावला. तर निफ्टीनेही आजपर्यंतचा १३,५४८.९० हा उच्चांक नोंदविला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.