ETV Bharat / business

'या' कंपनीच्या कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाला तर निवृत्तीपर्यंत कुटुंबाला मिळणार वेतन - tata steel employee benefits

टाटा स्टीलच्या सामाजिक सुरक्षा योजनेमुळे मृत कर्मचाऱ्याच्या कुटंबियांना सन्मानाने जगण्याची खात्री मिळणार आहे. याव्यतिरिक्त कंपनीकडून कर्मचाऱ्याच्या मुलांना शैक्षिणक भत्ताही मिळणार आहे.

Tata Steel
टाटा स्टील
author img

By

Published : May 25, 2021, 6:58 PM IST

Updated : May 25, 2021, 7:22 PM IST

बिझनेस डेस्क-ईटीव्ही भारत-कॉर्पोरेट क्षेत्रातील आघाडीची कंपनी टाटा स्टीलने कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला सामाजिक सुरक्षा योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तरी त्याच्या निवृत्तीच्या सेवेपर्यंत मिळणारे वेतन, घरभाडे भत्ता आणि वैद्यकीय भत्ता हा कुटुंबियांनी मिळणार आहे. याचा अर्थ कर्मचाऱ्याचा मृत्यू ४० व्या वर्षी झाली तरी पुढील २० वर्षे त्याच्या कुटुंबियांना कंपनीकडून वेतन दिले जाणार आहे.

टाटा स्टीलच्या सामाजिक सुरक्षा योजनेमुळे मृत कर्मचाऱ्याच्या कुटंबियांना सन्मानाने जगण्याची खात्री मिळणार आहे. याव्यतिरिक्त कंपनीकडून कर्मचाऱ्याच्या मुलांना शैक्षिणक भत्ताही मिळणार आहे. टाटा स्टीलने म्हटले की, आघाडीवर असलेल्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवाने कोरोनाने मृत्यू झाला तर कंपनीकडून कर्मचाऱ्याच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च पदवीपर्यंत करणार आहे. टाटा स्टीलकडून १६०० बेड्सचे, कोव्हिड आयसीयू बेड आणि आयसोलेशन बेडचे व्यवस्थापन करण्यात येत आहे.

हेही वाचा-नवीन नियमांचे पालन करण्याकरिता अंमलबजावणी प्रक्रिया सुरू- फेसबुक

टाटा स्टीलकडून रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा

  • कंपनीच्या मालकीचे असलेली सर्व रुग्णालये आणि सर्व उत्पादन प्रकल्पांमध्ये दररोज आरोग्य कर्मचाऱ्यांचे व फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचे १६ जानेवारीपासून लसीकरण करण्यात येत आहे.
  • टाटा स्टीलकडून जमशेदपूर, कलिंगनगर आणि धेनकानल येथील द्रवरुप वैद्यकीय (एलएमओ) ऑक्सिजन उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, झारखंड, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल, हरियाणा आणि दिल्लीमधील रुग्णालयांना पुरविण्यात येत आहे.
  • टाटा स्टील ही जगातील आघाडीची स्टील कंपनी आहे. कंपनीची वार्षिक ३४ दशलक्ष टन स्टीलचे उत्पादन घेण्याची क्षमता आहे.

हेही वाचा-टाटा स्टीलकडून आठवडाभरात ऑक्सिजनची दुप्पट निर्मिती; रोज 600 टनचा पुरवठा

Last Updated : May 25, 2021, 7:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.