नवी दिल्ली – नोकरीतून काढल्याने एअर इंडियाच्या 57 वैमानिकांनी कंपनीचा निषेध केला आहे. दुसरीकडे एअर इंडियाची मालकी असलेल्या अलायन्स एअरने कमांडर आणि श्रेणी एकमधील अधिकाऱ्यांची भरती सुरू केली आहे.
अलायन्स एअरने गेल्या आठवड्यात कमांडर आणि अधिकारीपदाची जाहिरात दिली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवसी एअर इंडियाने 57 वैमानिकांना सेवेतून काढले आहे. अलायन्स एअरची नोकरी भरती प्रक्रिया 18 सप्टेंबरला संपणार आहे.
कंपनी आर्थिक संकटात 57 वैमानिकांनी राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. काही कायम असलेले तर काही कंत्राटीतत्वावरील वैमानिकांनी राजीनामे दिले आहेत. त्यामधील काही वैमानिकांनी राजीनामे परत मागे घेण्यासाठी पत्र लिहिले आहे. या वैमानिकांच्या सेवेची एअर इंडियाला गरज नाही. त्यांचे राजीनामे आम्ही स्वीकारले आहेत.
इंडियन कर्मर्शियल पायलटस असोसिएशनने (आयसीपीए) एअर इंडियाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव बन्सल यांना पत्र पाठविले आहे. या पत्रास संघटनेने म्हटले, की सुमारे 50 वैमानिकांना बेकायदेशीपरणे मनुष्यबळ विभागाने काढले आहे. त्यामधून कंपनीच्या सेवेच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे.
दरम्यान, एअर इंडियाने आर्थिक संकटामुळे कर्मचाऱ्यांना वेतन देणे शक्य नसल्याचे म्हटले होते. तर यापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांत 40 टक्क्यांहून अधिक कपात केली आहे.