ETV Bharat / business

'मारुती सुझुकी' जानेवारीपासून वाढविणार वाहनांच्या किमती

गतवर्षी कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने मारुतीच्या वाहनांच्या उत्पादन खर्चावर परिणाम झाला. ही माहिती मारुती सुझुकीने शेअर बाजाराला दिली आहे.

Maruti to increase prices from January
मारुती सुझुकी वाहनांचे दर
author img

By

Published : Dec 3, 2019, 1:48 PM IST

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने वाहनांच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या किमती जानेवारीपासून वाढणार आहेत. उत्पादन खर्च वाढल्याने वाहनांच्या किमती वाढविण्यात येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

गतवर्षी कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने मारुतीच्या वाहनांच्या उत्पादन खर्चावर परिणाम झाला. ही माहिती मारुती सुझुकीने शेअर बाजाराला दिली आहे. उत्पादन खर्च वाढल्याने अतिरिक्त उत्पादना खर्चाचा भार काही प्रमाणात ग्राहकांवर टाकण्यात येणार आहे. मारुती सुझुकीच्या वाहनांच्या किमती विविध प्रमाणात वाढणार आहेत. मारुती अल्टो ते प्रिमिअर बहुउपयोगी एक्सएल ६ अशा विविध श्रेणींची वाहने मारुती सुझुकीकडून विकली जातात. या वाहनांची किंमत २.८९ लाख ते ११.४७ लाखापर्यंत आहे.

हेही वाचा-आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून सुरू; रेपो दरात कपातीची शक्यता

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने विक्री व्यवसायात 'मैलाचा दगड' गाठला आहे. भारतीय बाजारपेठेत मारुतीच्या एकूण २ कोटी प्रवासी वाहनांची आजवर विक्री झाली आहे. दरम्यान, वाहन उद्योगातील मंदीचा मारुती सुझुकीच्या वाहन विक्रीवरही परिणाम झाला आहे.

हेही वाचा-'मारुती'ने गाठला मैलाचा दगड; २ कोटी प्रवासी वाहनांची विक्री

Intro:Body:

Maruti Suzuki India will increase prices of its vehicles from January to offset rising input costs. This price increase shall vary for different models.

New Delhi: The country's largest car maker Maruti Suzuki India on Tuesday said it will increase prices of its vehicles from January to offset rising input costs.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.