नवी दिल्ली - सिल्व्हर लेक ही प्रायव्हेट इक्विटी फंड कंपनी रिलायन्स रिटेलमध्ये १ अब्ज डॉलर गुंतवणूक करण्यासाठी रिलायन्सबरोबर बोलणी करत आहे. ही गुंतवणूक झाली तर रिलायन्स रिटेलचे मूल्य हे ५७ अब्ज डॉलर होणार आहे. रिलायन्स रिटेल १० टक्के शेअर विकणार आहे.
सिलव्हर लेकने यापूर्वीच रिलायन्स जिओमध्ये १ ० हजार २०२.५५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. रिलायन्स रिटेल व्हेंटर्स लि. ही रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीची कंपनी आहे. रिलायन्सने रिटेलने नुकतेच फ्युचर ग्रुपचा संपूर्ण व्यवसाय विकत घेतला आहे. त्यासाठी कंपनीने फ्युचर ग्रुपला २४ हजार ७१३ कोटी रुपये दिले आहेत.
हेही वाचा- वाहनांच्या जीएसटी दरात कपात होणार; प्रकाश जावडेकरांचे उद्योगाला आश्वासन
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे किरकोळ बाजारपेठेतील व्यवसायाचाअधिक विस्तार करणार आहेत. त्यासाठी विविध ई-कॉर्मस कंपन्यांच्या खरेदीसाठी अंबानी हे बोलणी करत आहेत. देशात किरकोळ बाजारपेठेची ई-कॉमर्समध्ये मोठी बाजारपेठ आहे. रिलायन्सच्या ई-कॉर्मस व्यवसायाला अॅमेझॉनकडून मोठी स्पर्धा आहे.
रिलायन्स रिटेल व्हेंचर्सने ई-फार्मा कंपनी नेटमेड्समध्ये मोठा हिस्सा घेतला आहे. त्यासाठी रिलायन्सकडून नेटमेडला सुमारे ६२० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. रिलायन्स नेटमेडची मालकी असलेल्या विटालिकमध्ये ६० टक्के हिस्सा घेणार आहे, तर विटालिकच्या इतर तीन कंपन्यांची पूर्ण मालकी घेणार आहे. यामध्ये ट्रेसरा हेल्थ प्रायव्हेट, नेटमेड्स मार्केट प्लेस आणि दाधा फार्मा डिस्ट्रिब्युटिशन या कंपन्यांचा समावेश आहे. विटालिक हेल्थ आणि इतर तीन कंपन्यांना मिळून नेटमेड्स म्हटले जाते.
हेही वाचा-पिनाका शस्त्रास्त्र यंत्रणा पुरविण्याचे एल अँड टीला कंत्राट; संरक्षण दलाने दिली ऑर्डर