ETV Bharat / business

कोव्हिड-१९ लसचा इंग्लंडला आणखी पुरवठा करण्याचा नंतर प्रयत्न करू-सीरम - covishield suppy to UK

सीरमच्या प्रवक्त्याने म्हटले की, ५० दशलक्ष डोस हे काही आठवड्यापूर्वी इंग्लंडला पाठविण्यात आले आहेत. सध्याची परिस्थिती आणि भारतामधील लसीकरणाची मोहिम लक्षात घेता नंतर इंग्लंडमध्ये कोरोना लशीचा पुरवठा करण्यात येणार आहे.

SII
सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया
author img

By

Published : Mar 19, 2021, 6:59 PM IST

नवी दिल्ली - इंग्लंडमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) या देशात आणखी लस पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. इंग्लंडच्या आरोग्य सेवा विभागाने या महिनाखेर कोव्हिड लशीचा साठा कमी असल्याचा नुकताच इशारा दिला होता.

सीरमच्या प्रवक्त्याने म्हटले की, ५० दशलक्ष डोस हे काही आठवड्यापूर्वी इंग्लंडला पाठविण्यात आले आहेत. सध्याची परिस्थिती आणि भारतामधील लसीकरणाची मोहिम लक्षात घेता नंतर इंग्लंडमध्ये कोरोना लशीचा पुरवठा करण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात सीरमचे सीईओ आदार पुनावाला यांनी इतर देशांना कोरोना लशीचा पुरवठा मिळण्यासाठी संयम ठेवण्याचे आवाहन केले होते. सीरमकडून भारतात कोव्हिशिल्ड लशीचा पुरवठा प्राधान्याने करण्यात येत आहे.

हेही वाचा-सीरमच्या लसींचे एक कोटी डोस ब्रिटनला रवाना

इंग्लंडमध्ये गुरुवारी नवीन ६,३०३ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुधवारी नवीन ५,७५८ नवीन रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या २४ तासात देशामध्ये ४० हजार कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने १६ जानेवारीपासून सुरू केलेल्या लसीकरण कार्यक्रमात कोव्हिशिल्ड आणि कोव्हिक्सिनचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. इंग्लंड सरकारने पुण्यातील सीरमशी कोरोना लसींबाबत करार केला होता. यानुसार सीरम इन्स्टिट्यूट ऑक्सफोर्ड-अ‌ॅस्ट्राझेनेका निर्मित कोरोना लसीचे दहा कोटी डोस इंग्लंडला देणार आहे. त्यांपैकी दहा कोटी डोसेसची पहिली खेप इंग्लंडला रवाना झाली आहे.

हेही वाचा-धक्कादायक! चिनी हॅकरकडून सीरमसह भारत बायोटेकवर सायबर हल्ला- अहवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.