मुंबई - शपूरजी पलूनजी ग्रुप (एसपी ग्रुप) सत्तर वर्षांपासून भागीदारीत असलेल्या टाटा ग्रुपपासून विभक्त होणार आहे. त्यासाठी एसपी ग्रुपने सर्वोच्च न्यायालयात टापासून विभक्त होण्याकरता प्रस्ताव दिला आहे.
शपूरजी पलूनजी ग्रुपचा टाटा ग्रुपमध्ये १.७५ लाख कोटी रुपयांचा हिस्सा आहे. ही माहिती शपूरजी पलूनजी ग्रुपने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून २८ ऑक्टोबर २०१६ रोजी संचालक मंडळाने काढून टाकले. तेव्हापासून टाटा ग्रुप आणि शपूरजी ग्रुपमध्ये कायदेशीर वाद आहे.
शपूरजी पलूनजीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या पत्रात म्हटले...
टाटा सन्स ही दोन ग्रुपची कंपनी आहे. टाटा ग्रुपमध्ये टाटा ट्रस्ट, टाटाचे कुटुंबीय सदस्य आणि टाटाच्या कंपन्यांचा ८१.६ टक्के हिस्सा आहे. तर १८.३७ टक्के हिस्सा हा मिस्त्री कुटुंबाचा असल्याचे मिस्त्री ग्रुपने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या पत्रात म्हटले आहे. एसपी ग्रुपच्या १८.३७ टक्के हिश्याची किंमत १ लाख ७५ हजार कोटी असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
काय आहे टाटा सन्स आणि सायरस मिस्त्री यांच्यातील वाद?
सायरस मिस्त्री यांची टाटा ग्रुपचे सहावे चेअरमन म्हणून २०१२ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांना २४ ऑक्टोबर २०१६ मध्ये टाटा संचालक मंडळाने पदावरून काढले होते. हे कृत्यदेखील बेकायदेशीर असल्याचे कायदे लवाद प्राधिकरणाने म्हटले होते
इन्व्हेस्टमेंट्स आणि स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंट्स कॉर्प या दोन कंपन्या सायरस यांच्या मालकीच्या आहेत. त्यांनी मुंबईमध्ये कार्यालय असलेल्या एनसीएलएटीमध्ये टाटा सन्सविरोधात याचिका दाखल केली होती. तसेच दडपशाही आणि गैरव्यवस्थापन होत असल्याचा आरोप याचिकेत केला होता. यापूर्वी प्राधिकरणाने सायरस यांची याचिका रद्द केली होती. टाटा कन्सलन्टन्स सर्व्हिसचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी २० फेब्रुवारी २०१७ ला टाटा सन्सच्या चेअरमनपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.