ETV Bharat / business

संपूर्ण देशात लसीकरण होण्याकरिता दोन-तीन वर्षे लागणार-अदर पुनावाला

सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी ट्विट करून लसीकरण मोहिमेविषयी मत व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की लोकसंख्येबाबत जगात आपल्या देशाचा दुसरा क्रमांक आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात लसीकरण मोहिम दोन-तीन महिन्यांत शक्य नाही.

अदर पुनावाला
अदर पुनावाला
author img

By

Published : May 18, 2021, 8:01 PM IST

Updated : May 18, 2021, 8:21 PM IST

पुणे- देशात कोरोना लसीकरण मोहिम कासवगतीने सुरू असताना आणखी चिंताजनक वाढविणारी माहिती समोर येत आहे. संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण होण्याची तीन वर्षे लागणार असल्याचे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी म्हटले आहे.

सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी ट्विट करून लसीकरण मोहिमेविषयी मत व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की लोकसंख्येबाबत जगात आपल्या देशाचा दुसरा क्रमांक आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात लसीकरण मोहिम दोन-तीन महिन्यांत शक्य नाही. त्यामध्ये अनेक मुद्दे आणि आव्हानांचा समावेश आहे. त्यामुळे संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण होण्याची तीन वर्षे लागणार असल्याचे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी म्हटले आहे.

सीरमचे पत्र
सीरमचे पत्र

हेही वाचा-मुंबई शेअर बाजाराने ओलांडला पुन्हा ५०,००० चा टप्पा!

लसीकरण मोहिमेला सर्व पद्धतीने मदत करण्यासाटी कटिबद्ध राहणार

कोरोना महामारीत देशात लशींचा साठा अपुरा असताना टीकेची झोड होत असताना सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी खुलासा केला आहे. सीरमकडून देशाला प्राधान्य दिले जात असल्याचे पुनावाला यांनी म्हटले आहे. याबाबत स्पष्टीकरण करणारे पत्र त्यांनी ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे, की लोकांची किंमत चुकवून आम्ही लस कधीही निर्यात केली नाही, याचा आम्हाला पुनरुच्चार करायला आवडेल. तसेच देशातील लसीकरण मोहिमेला सर्व पद्धतीने मदत करण्यासाटी कटिबद्ध राहणार आहोत.

हेही वाचा-चांदी महागली! दोन दिवसांत प्रति किलो ३ हजारांनी वाढले दर

अनेक देशातही संकट, त्यांनाही मदतीची गरज

यावर्षी देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी असताना इतर देशांत संकट होते. अशावेळी कोव्हिशिल्डची विदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यात आली आहे. आमच्याकडे जानेवारी २०२१ मध्ये कोरोना लशीचा मोठा साठा होता. जेव्हा कोरोनाबाधितांचे प्रमाण खूप कमी झाले, तेव्हा लसीकरण मोहिमेची यशस्वीपणे सुरुवात झाली. सध्याच्या स्थितीला बहुतांश लोक आणि आरोग्यतज्ज्ञांच्या मते देशात महामारीची लाट आलेली आहे. सध्याच्या स्थितीला अनेक देशातही संकट भेडसावत आहे. त्यांनाही मदतीची गरज आहे.

हेही वाचा-सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ऑक्सिजन निर्मितीला सुरुवात; 200 रुग्णांची गरज भागणार

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ऑक्सिजन निर्मितीला सुरुवात

दरम्यान, शहर व जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी आता कोरोनावर प्रतिबंधात्मक लस निर्माण करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटनेही पुढाकार घेतला आहे. दररोज २०० कोरोना रुग्णांना पुरेल इतक्या वैद्यकीय उपयोगाची ऑक्सिजन निर्मिती सीरम इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात येणार आहे.

Last Updated : May 18, 2021, 8:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.