सेऊल - स्वस्त दरात मनुष्यबळ उपलब्ध करून देणारा देश ही चीनची ओळख पुसली जात आहे. याचा फटका चीनमधील उत्पादन क्षेत्राला बसत आहे. सॅमसंगने चीनमधील स्मार्टफोनचे उत्पादन थांबविले आहे. चीनमधील हुझोवूमध्ये सॅमसंगचा कारखाना आहे. तेथे काम करणे शक्य होत नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.
उत्पादनाच्या सुविधामधील कार्यक्षमता वाढविण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न केले जातात. त्याचा भाग म्हणून हा चीनमधील कारखाना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सॅमसंग कंपनीने म्हटले आहे. चीनमधील कारखाना बंद करताना तेथील सरकारच्या नियमांचे पालन केले जात असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-भारतीय बँकिंग क्षेत्र सदृढ आणि स्थिर - शक्तिकांत दास
गेल्यावर्षी सॅमसंगने चीनमधील टिनजीन येथील कारखाना बंद केला होता. चीन ही जगातील सर्वात मोठी स्मार्टफोची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. मात्र, कामगारांच्या खर्चात वाढ होत असल्याने सॅमसंगने तेथील कारखाना बंद केला आहे.
हेही वाचा-स्मार्टफोनचे नवे युग: दुमडू शकणारा 'सॅमसंग फोल्ड' भारतातही; ही आहेत वैशिष्ट्ये