नवी दिल्ली - अर्थव्यवस्था मंदावली असताना रिलायन्सने इंडस्ट्रीजने '२०२० फोर्च्युन इंडिया ५००' यादीत पहिला क्रमांक पटकाविण्यात यश मिळविले आहे.फोर्च्युन इंडियाने सार्वजनिक बँक इंडियन ऑईल कॉर्पोरेशनला (आयओसी) या यादीत पहिल्यांदाच मागे टाकले आहे. गतवर्षी आयओसी यादीत प्रथम होती.
'२०२० फोर्च्युन इंडिया ५००' ही यादी कंपनीने मिळविलेल्या उत्पन्नावर तयार करण्यात येते. कोरोना महामारीत देशातील सर्वात मोठ्या कंपन्या अडचणींना सामोरे गेल्याचे दिसून आले आहे. तसेच देशातील कॉर्पोरेट क्षेत्र बळकट असल्याचे दिसून आले आहे. जागतिक अर्थव्यवस्था वेगाने बदलत आहे. कोरोना महामारीनंतर देशातील कॉर्पोरेट इंडियाला नव्या जगापुढे जावे लागेल, असे फोर्च्युन इंडियाने म्हटले आहे.
हेही वाचा-सीमारेषेवर तणाव असतानाही चीन भारताकडून खरेदी करणार ५ हजार टन तांदूळ; दोन वर्षानंतर होणार आयात
या कंपन्यांचा पहिल्या दहामध्ये समावेश-
'२०२० फोर्च्युन इंडिया ५००' च्या पहिल्या १० कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, ऑईल आणि नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, स्टेट बँक ऑफ इंडिया, भारत पेट्रोलियम, टाटा मोटर्स, राजेश एक्सपोर्ट्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, आयसीआयसीआय बँक आणि एल अँड टी या कंपन्यांचा समावेश आहे.
हेही वाचा-आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून सुरू; 4 डिसेंबरला जाहीर होणार रेपो दर
भारतीय फोर्च्युन ५०० कंपनीमधील ३८ कंपन्यांचे एकूण उत्पन्न ५० हजार कोटींहून अधिक आहे. हे भारतीय कॉर्पोरेट कंपन्यांच्या एकूण उत्पन्नापैकी ६० टक्के आहे. तर १३९ कंपन्यांनी प्रत्येकी ३ हजार कोटी रुपयांहून अधिक नफा मिळविला आहे. हे प्रमाण ५०० भारतीय फोर्च्युन कंपन्यांच्या चार टक्के इतके आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील सर्वात मोठी भांडवली मूल्य असलेली कंपनी-
रिलायन्स इंडस्ट्रीजने भांडवली मूल्यात सप्टेंबर २०२० मध्ये मैलाचा दगड गाठला आहे. रिलायन्सचे एकूण भांडवली मूल्य २०० अब्ज डॉलर झाले आहे. एवढे भांडवली मूल्य असलेली रिलायन्स ही देशातील एकमेव कंपनी आहे. रिलायन्सचे शेअरची किंमत वाढल्याने कंपनीच्या भांडवली मूल्यात वाढ झाली आहे.