ETV Bharat / business

आरएफएल प्रकरण : आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मालविंदर सिंगला ईडीने केली अटक

सक्त वसुली अंमलबजावणी संचालनालयाने मालविंदर सिंग आणि सुनील गोधवानी यांना तिहार तुरुंगातून ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलिसांनी रिलिगेअर फिनवेस्टमधील पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी  गुन्हा दाखल केला आहे.

संग्रहित - ई़डी
author img

By

Published : Nov 14, 2019, 7:32 PM IST

नवी दिल्ली - फोर्टिस हेल्थकेअरचा माजी प्रवर्तक मालविंदर सिंग आणि रिलीग्री एन्टरप्रायजेसचा माजी सीएमडी सुनील गोधवानीला ईडीने अटक केली आहे. अटकेतील आरोपींवर रिलीगेअर फिनवेस्ट कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यातून कंपनीचे सुमारे २ हजार ३९७ कोटींचे नुकसान झाले आहे.

सक्त अंमलबजावणी संचालनालयाने मालविंदर सिंग आणि सुनील गोधवानी यांना तिहार तुरुंगातून ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलिसांनी रिलिगेअर फिनवेस्टमधील पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना महान्याय दंडाधिकाऱ्यापुढे हजर करण्यात येणार आहे. आरोपींची अधिक चौकशी करण्यासाठी ईडीकडून कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याचे प्रकरणाशी संबंधित वकिलाने सांगितले.

हेही वाचा-कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करणे अव्यवहारी; शेतकऱ्यांसह आडतदारांमधून प्रतिक्रिया

ईडीनेही टाकले होते छापे

रिलिगेअर फिनवेस्ट लि. कंपनीने दिल्लीच्या आर्थिक गुन्हे शाखेत गतवर्षी डिसेंबरमध्ये तक्रार दिली होती. त्यानंतर सिंग बंधूवर ७४० कोटींच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. चालू वर्षात ऑगस्टमध्ये सक्त वसुली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रॅनबॅक्सीचा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मालविंदर सिंग आणि त्याचा भाऊ शिविंदर सिंग यांच्या घरांवर छापे टाकले होते. ईडीने मनी लाँड्रिंगप्रकरणी ही कारवाई केली होती.

हेही वाचा-अपेक्षेहून अधिक काळ राहिली मंदी; मूडीजने देशाच्या जीडीपीचा घटविला अंदाज

Intro:Body:

Dummy Business News

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.