नवी दिल्ली - रिलायन्स रिटेल कंपनी ही ऑनलाईन व्यवसाय सुरू करणार आहे. ही कंपनी व्यवसायात उतरल्यास अॅमेझॉन आणि वॉलमार्ट-फ्लिपकार्टसमोर मोठे आव्हान उभे निर्माण करण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती जागतिक बाजारपेठेचे संशोधन करणाऱ्या फॉरेस्टर संस्थेने अहवालातून दिली आहे.
ग्लोबल मार्केट रिसर्चचर फॉरेस्टरच्या माहितीनुसार रिलायन्स रिटेलचे ६ हजार ६०० हून अधिक शहरात १० हजार ४१५ स्टोअर आहेत. रिलायन्सकडून देण्यात येणाऱ्या मोठ्या सवलतीमुळे अॅमेझोन व फ्लिपकार्ट संकटात सापडेल, असा अंदाज फॉरेस्टरचे विश्लेषक सतिश मीना यांनी व्यक्त केला. ई-कॉमर्स धोरणातील नव्या नियमामुळे रिलायन्स रिटेलला फायदा होणार आहे. तसेच रिटेलच्या पायाभूत सेवांचा ग्राहकांना सेवा देण्यासाठी उपयोग करता येणार असल्याचे फॉरेस्टरच्या अहवालात म्हटले आहे.
यापूर्वी ग्राहकांना भरघोस सवलती देवून रिलायन्सने बाजारपेठेत केले होते भक्कम स्थान -
रिलायन्सने २००३ मध्ये दूरसंचार क्षेत्रात प्रवेश करताना मान्सून हंगामाची योजना जाहीर केली होती. त्यानंतर व्हाईस कॉल हे २ मिनिटावरून थेट ४० पैशावर आले. तर जीओ '४ जी'चा रिलायन्सने २०१६ मध्ये शुभारंभ केल्यानंतर डाटाचे दर प्रति जीबी २५० रुपयावरून ५० जीबी झाले आहेत.
रिलायन्स हे जगातील सर्वात मोठे ऑनलाईन-ऑफलाईन असलेले ई-कॉमर्स माध्यम सुरू करणार असल्याचे मुकेश अंबानी यांनी जाहीर केले होते. रिलायन्सने कर्मचाऱ्यांसाठी फुड आणि ग्रोसरी अॅप एप्रिल २०१९ मध्ये सुरू केले. रिलायन्स रिटेल हे देशातील किरकोळी विक्रीतील सर्वात मोठी कंपनी आहे.