ETV Bharat / business

रिलायन्सकडून ओटूसी व्यवसायाकरता स्वतंत्र कंपनीची घोषणा

रिलायन्सचे तेल शुद्धीकरण, विपणन आणि पेट्रोकेमिकल मालमत्ता ही संपूर्णपणे ऑईल टू केमिकल हलविण्यात येणार आहे. ही माहिती रिलायन्सने सोमवारी रात्री उशिरा शेअर बाजाराला दिली आहे.

Reliance Industries news
रिलायन्स इंडस्ट्रीज न्यूज
author img

By

Published : Feb 23, 2021, 6:19 PM IST

मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजने (आरआयएल) ऑईलमधील व्यवसाय रसायनमध्ये (ऑईल टू केमिकल) हलविण्यास करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी स्वतंत्र कंपनी अस्तित्वात येणार आहे. त्यावर रिलायन्सच्या व्यवस्थापनाचे १०० टक्के नियंत्रण राहणार आहे.

रिलायन्सचे तेल शुद्धीकरण, विपणन आणि पेट्रोकेमिकल मालमत्ता ही संपूर्णपणे ऑईल टू केमिकल हलविण्यात येणार आहे. ही माहिती रिलायन्सने सोमवारी रात्री उशिरा शेअर बाजाराला दिली आहे. प्रवर्तक ग्रुपचा ऑईल टू केमिकलमध्ये ४९.१४ टक्के हिस्सा राहणार आहे. तसेच शेअरमधील हिश्यात कोणताही बदल होणार नसल्याचे रिलायन्सने म्हटले आहे.

हेही वाचा-सोने प्रति तोळा ३३७ रुपयांनी महाग

काय म्हटले आहे रिलायन्सने?

  • ओटूसीमधील टीम ही पूर्णपणे नव्या कंपनीमध्ये काम करणार आहे.
  • रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ओटूसी कंपनी २०३५ पर्यंत कार्बनचे उत्सर्जन शून्य करण्यासाठी एकत्रित काम करणार आहे.
  • ओटूसी व्यवसायातून कार्बन डायऑक्साईडचा उपयोग उपयुक्त उत्पादन आणि रसायनांसाठी करण्यात येणार आहे.
  • तसेच कार्बनवर आधारित असलेल्या हायड्रोडन अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
  • ओटूसीमध्ये २० टक्के हिस्सा घेण्यासाठी रिलायन्सची सौदी अरेबियाची अ‌ॅरेम्को कंपनीबरोबर चर्चा सुरू आहे. अ‌ॅरेम्को ही कच्च्या तेलाची निर्यात करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे.

हेही वाचा-'५ जी'चे वेध; एअरटेलची क्वाकोम्नबरोबर संयुक्त भागीदारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.