मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेला १० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. नियमांचे पालन करताना त्रुटी राहिल्याने हा दंड ठोठावण्यात आला आहे.
एचडीएफसी बँकेकडून नियमांचे पालन करताना त्रुटी राहिली तर त्याचा कोणत्याही व्यवहारावर आणि ग्राहकांशी संबंधित कराराचा संबंध नसल्याचे आरबीआयने म्हटले आहे. एचडीएफसी बँकेच्या मार्केटिंग आणि तृतीय पक्षाच्या बिगर आर्थिक उत्पादनांशी संबंधित कागदपत्रांची आरबीआयने एका जागल्याच्या तक्रारीनुसार पाहणी केली.
हेही वाचा-दिलासादायक! कोरोनावरील उपचारात वापरण्यात येणाऱ्या औषधांना आयात शुल्क माफ
वाहन कर्जाच्या पोर्टफोलिओमध्ये अनियमितता असल्याची जागल्याने आरबीआयला तक्रार केली होती. त्यावरून आरबीआयने एचडीएफसी बँकेला कारणे दाखवा नोटीस पाठविली. बँकिंग कायद्यानुसार कारवाई का करू नये, अशी विचारणा आरबीआयने नोटीसमध्ये केली होती.
हेही वाचा-कोव्हॅक्सिनचे उत्पादन ते लसीकरणापर्यंत चार महिन्यांचा लागतो वेळ- भारत बायोटेक
त्रुटी आढळल्याने आर्थिक दंड-
कारणे दाखवा नोटीसला दिलेले लेखी व तोंडी उत्तर आणि वैयक्तिक सुनावणी घेतल्यानंतर आरबीआयने कागदपत्रांचीही पडताळणी केली. त्यामध्ये त्रुटी आढळल्याने नियमानुसार आर्थिक दंड ठोठावल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
सेबीने एचडीएफसीला जानेवारी २०२१ मध्ये ठोठावला होता दंड
एचडीएफसीला तारण ठेवलेले बीआरएच वेल्थ क्रियटरचे शेअर विकणे महागात पडले होते नियमभंग केल्यामुळे सेबीने एचडीएफसी बँकेला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. तसेच एचडीएफसीला १५८.६८ कोटी रुपये प्रति वर्षी ७ टक्के दराने इस्क्रो अकाउंटमध्ये जमा करण्याचे आदेश सेबीने दिले आहेत.