ETV Bharat / business

सायरस मिस्त्री प्रकरण : रतन टाटा यांची सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका - Cyrus Mistry

रतन टाटा यांनी टाटा सन्सचे नाव करण्यासाठी अर्ध्याहून अधिक आयुष्य व्यतीत केले आहे. त्यामुळे पुराव्याविना दिलेला एनसीएलएटीचा (राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरण)  निकाल हा अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

Ratan Tata
रतन टाटा
author img

By

Published : Jan 3, 2020, 11:52 PM IST

नवी दिल्ली - टाटा सन्सच्या चेअरमनपदी सायरस मिस्त्री यांची नियुक्ती करण्याचे आदेश एनसीएलएटीने दिले होते. या निकालाला टाटा सन्स पाठोपाठ रतन टाटा यांनीही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. एनसीएलएटीने दिलेला निकाल हा चुकीचा आणि विसंगत असल्याचे टाटा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेत म्हटले आहे. .

रतन टाटा यांनी टाटा सन्स व्यतिरिक्त स्वतंत्र याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. याचिकेत म्हटले आहे की, सायरस मिस्त्री यांची व्यावसायिक क्षमतेप्रमाणे नियुक्ती करण्यात आली होती. शापूरजी पाल्लूनजी ग्रुपचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली नव्हती.

हेही वाचा-टाटा-मिस्त्री प्रकरण : कंपनी निबंधकांच्या याचिकेवरील एनसीएलएटीचा निकाल राखीव

रतन टाटा यांनी टाटा सन्सचे नाव करण्यासाठी अर्ध्याहून अधिक आयुष्य व्यतीत केले आहे. त्यामुळे पुराव्याविना दिलेला एनसीएलएटीचा (राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरण) निकाल हा अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक असल्याचे याचिकेत म्हटले आहे. सायरस मिस्त्री यांना टाटा डोकोमोसोबतच्या केलेल्या व्यवहारामुळे कंपनीच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचेही रतन टाटा यांनी याचिकेत म्हटले आहे.

हेही वाचा-टाटा सन्स: एनसीएलएटीने कंपनी निबंधक कार्यालयाकडून मागविला 'हा' खुलासा

Intro:Body:

Dummy news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.