ETV Bharat / business

वाहन उद्योग जीएसटी कपातीची आतुरतेने वाट पाहतोय - मारुती सुझुकी एमडी - GST reduction demand by Auto sector

मारुती सुझुकीचे सीईओ केनेची आयुकावा म्हणाले, की आम्ही जीएसटी कपातीची आणि स्क्रॅपेज योजनेची आतुरतेने वाट पाहणार आहोत. कंपन्यांच्या उलाढालीवरील कर हा जीएसटी कपातीहून अधिक असेल असा आमचा विश्वास आहे.

संग्रहित-मारुती सुझुकी
संग्रहित-मारुती सुझुकी
author img

By

Published : Sep 4, 2020, 8:17 PM IST

नवी दिल्ली - कोरोना महामारीचा फटका बसलेला वाहन उद्योग जीएसटी कपातीची वाट पाहत असल्याचे मारुती सुझुकीचे व्यवस्थापकीय संचालक केनेची आयुकावा यांनी म्हटले आहे. ते एसआयएएमच्या ऑनलाईन वार्षिक कार्यक्रमात बोलत होते.

मारुती सुझुकीचे सीईओ केनेची आयुकावा म्हणाले, की आम्ही जीएसटी कपातीची आणि स्क्रॅपेज योजनेची आतुरतेने वाट पाहणार आहोत. कंपन्यांच्या उलाढालीवरील कर हा जीएसटी कपातीहून अधिक असेल असा आमचा विश्वास आहे.

ऑनलाईन कार्यक्रमात केंद्रीय अवजड आणि सार्वजनिक उद्योग मंत्री यांनी जीएसटी कपातीचा विषय केंद्रीय अर्थमंत्री व पंतप्रधानांपर्यत पोहोचू असे सांगितले. त्याबद्दल आयुकावा यांनी केंद्रीय मंत्री जावडेकर यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा-वाहनांच्या जीएसटी दरात कपात होणार; प्रकाश जावडेकरांचे उद्योगाला आश्वासन

पुढे केनेची आयुकावा म्हणाले, जर सरकारला काही देशासाठी चांगले करायचे असेल तर त्यासाठी निधी लागतो, हे आम्हाला माहिती आहे. आम्ही जो जीडीपी निर्माण करतो, त्यावरील करातून सरकारला महसूल मिळतो. त्यामुळे आमचे उत्पादन आणि विक्री यांचे प्रमाण जास्तीत जास्त करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे उदरनिर्वाहांचे संरक्षण करण्यासाठी मदत होणार आहे. तसेच सरकारचा महसूल आरोग्यदायी राहून सामाजिक कल्याणकारी योजनांसाठी वापरणे शक्य होईल, असे मारुती सुझुकीचे संचालक केनेची यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-'या' तारखेपूर्वी खरेदी केलेले वाहन असल्यास फास्टॅग असणार अनिवार्य; सरकारचा प्रस्ताव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.