ग्रेटर नोएडा - सहा दिवसांच्या ऑटो एक्स्पोमध्ये सर्व आघाडीच्या वाहन कंपन्यांनी एसयूव्हीमधील इलेक्ट्रिक वाहनांचे लाँचिंग केले आहे. घरासारख्या विविध सुविधा असलेल्या मर्सिडिजचे मॉडेल वाहन प्रदर्शनात आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
मर्सिडीज बेन्झने मॅर्को पोलो या मोठ्या एसयूव्ही कारचे लाँचिंग केले आहे. ही कार एखाद्या घरासारखी मोठी आहे. मर्सिडिज कंपनीचे विक्री प्रतिनिधी एस. रिकेश म्हणाले, खूप लांबच्या प्रवासासाठी जाणाऱ्या कुटुंबाला लक्ष्य ठेवून कारची रचना केली आहे. यामध्ये बेड, शॉवर, स्वयंपाकघर अशा सुविधा आहेत. यामध्ये चारजण झोपू शकतात. स्वयंपाक करू शकतात.
हेही वाचा-विनाकारण बँकांनी कर्ज नाकारले तर एमएसएमई उद्योगांना करता येणार तक्रार
जर खुर्च्या दुमडल्या (फोल्ड) तर कारमध्ये तंबू ठेवता येतो. ज्यांच्याकडे ही कार आहे, त्यांना एखादे रिसॉर्ट बुक करण्याची गरज नाही. कारण तशा कारमध्ये सुविधा आहेत. या कारची १.४६ कोटी रुपये किंमत आहे. ही कार डिझेल श्रेणीमधील आहे. त्यामध्ये दोन लिटर डिझेल साठवणुकीची क्षमता आहे. डोंगरी भागातही ही कार चालू शकते.
हेही वाचा-VIDEO- केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच वरिष्ठ अधिकाऱ्याच्या डुलक्या
फोक्सवॅगन टायगन, टी-रॉक, टायगन आणि टायगन अॅलस्पेस ही चार एसयूव्ही श्रेणीतील वाहने फोक्सवॅगन दोन वर्षात लाँच करणार आहे. या मॉडेलच्या प्रतिकृती ऑटो एक्स्पोमध्ये ठेवण्यात आल्या आहेत.
आयडी क्रॉझ हे फोक्सवॅगनची जागतिक इलेक्ट्रिक वाहन संकल्पना आहे. हे मॉ़डेलही वाहन प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे. मर्सिडिज बेन्झ क्लास एचे विक्री प्रतिनिधी धनंजय पाटोळे म्हणाले, एमएडी ए ३५ ४ मॅटिक लायमझिन लाँच करण्यात आली आहे. या नव्या एसयूव्ही श्रेणीतील वाहनाची ५६ लाख रुपये किंमत आहे. ही पेट्रोलवर चालणारे वाहन आहे. सर्व वर्गातील भारतीयांसाठी ही कार उत्तम आहे. ही कार प्रति ताशी २५० किमी वेगाने धावू शकते, असेही पाटोळे यांनी सांगितले. वाहन प्रदर्शनात फोक्सवॅगन, टाटा मोटर्स आदी कंपन्यांनी आरामदायी मॉडेल स्टॉलवर ठेवली आहेत.