ETV Bharat / business

मंदीने वाहन उद्योगाला 'ब्रेक' : लुकास टीव्हीएसकडून कर्मचाऱ्यांना दोन दिवस बिनपगारी सुट्टी

author img

By

Published : Aug 16, 2019, 8:18 PM IST

जर बाजारपेठेत सुधारणा झाली तर कर्मचाऱ्यांना सांगितले जाईल, असे कंपनीने नोटीसमध्ये म्हटले आहे. कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे, असेही टीव्हीएस ग्रुपने आवाहन केले आहे.

लुकास टीव्हीएस

चेन्नई - वाहन उद्योगातील मंदीचा फटका वाहनांचे सुट्टे भाग बनविणाऱ्या लुकास टीव्हीएस कंपनीलाहा बसत आहे. टीव्हीएस ग्रुपने कंपनीमधील कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवस बिनपगारी सुट्टी जाहीर केली आहे.

टीव्हीएस ग्रुपने गेल्या महिन्यातही कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर केली होती. उद्योगामध्ये मंदी सुरुच असल्याने कामाचे दिवस कमी करण्यात आल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले आहे. कर्मचाऱ्यांसाठी १६ ऑगस्ट आणि १७ ऑगस्ट या दिवशी काम बंद असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. जर बाजारपेठेत सुधारणा झाली तर कर्मचाऱ्यांना सांगितले जाईल, असे कंपनीने नोटीसमध्ये म्हटले आहे. कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे, असेही टीव्हीएस ग्रुपने आवाहन केले आहे.

सुंदरम-क्लेटॉन लिमिटेड कंपनी दोन दिवस बंद -
सुंदरम-क्लेटॉन लिमिटेड ही अॅल्युमिनिअम डाय कास्ट तयार करणारी कंपनी १६ व १७ ऑगस्टला बंद राहणार आहे. पॅडी येथील उत्पादन प्रकल्पात दोन दिवस कर्मचाऱ्यांना काम बंद राहणार आहे.

एन्नोरेमधील अशोक लिलँड कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांचा संप-
एन्नोरेमधील हिंदूजा ग्रुपच्या अशोक लिलँड कंपनीमध्ये कामगारांनी बोनस वाढीसाठी आंदोलन केले. याबाबत कामगार संघटनेने म्हटले की, आमची १४ ऑगस्टला बैठक होती. त्यांनी ५ टक्के बोनस दिलेली ऑफर आम्ही स्विकारलेली नाही. आम्ही धरणे आंदोलन केले आहे. दोन पाळ्यांमध्ये काम करणारे १ हजार ८०० कामगार आंदोलन करत असल्याची माहिती कामगार संघटनेने दिली.

Intro:Body:

bizdd

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.