नवी दिल्ली - जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून असलेली अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची ओळख पुसली आहे. कारण, फोर्ब्सच्या यादीनुसार लूईस वूईट्टन हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. लूईस हे एलव्हीएमएच मोएट हेननेस्सीचे सीईओ आणि चेअरमन आहेत.
फोर्ब्स ही संस्था दररोज अब्जाधीशांची संपत्तीची आकडेवारी रिअल-टाईम दाखविते. या आकडेवारीनुसार लूईस वूईट्टन यांची एकूण संपत्ती ही 198.2 अब्ज डॉलर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेले जेफ बेझोस यांची एकूण संपत्ती ही 194.9 अब्ज डॉलर आहे. कोरोनाच्या काळात अॅमेझॉनची संपत्ती 2020 मध्ये 38 टक्क्यांनी वाढून 386 अब्ज डॉलरवर पोहोचली. कारण, कोरोनाच्या काळात लोकांनी घरी राहून खरेदी करण्याला प्राधान्य दिले. एलव्हीएचएम कंपनीचे जगभरात 70 ब्रँड आहेत. यामध्ये गुक्की, लूईस वूईट्टन या ब्रँडचा समावेश आहे.
मार्क झुकेरबर्ग यांचा जगातील सर्वात श्रीमंताच्या यादीत जगात पाचवा क्रमांक
जगातील सर्वात श्रीमंताच्या यादीत जेफ बेझोस यांच्यानंतर टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकेरबर्ग यांचा अनुक्रमे तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक आहे.
दरम्यान, फोर्ब्सची यादी सतत बदलत असते.