ETV Bharat / business

'या' कंपनीत ३१९ कोटींच्या गुंतवणुकीनंतरही २००हून अधिक कर्मचाऱ्यांवर संक्रात

author img

By

Published : May 23, 2020, 8:30 PM IST

दरवर्षी टीममधील १५ ते २० टक्के सदस्य कामगिरी पाहून कमी करण्यात येतात. यंदा कर्मचाऱ्यांच्या कपातीत वाढ करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

नवी दिल्ली - वित्तीय तंत्रज्ञानातील लेडिंगकार्ट टेक्नॉलॉजीने चालू आठवड्यात ३१९ कोटी रुपयांचा निधी गुंतवणूकदारांकडून मिळविला आहे. तरीही कंपनीने सुमारे २०० हून अधिक (एकूण मनुष्यबळाच्या ३० टक्के) कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे.

कोरोनाचे संकट आणि मंदावलेल्या आर्थिक स्थितीमुळे व्यवसायावर परिणाम झाल्याचे लेडिंगकार्टने म्हटले आहे. व्यवसाय टिकविण्यासाठी काही सुधारणा करण्याची गरज आहे. दरवर्षी टीममधील १५ ते २० टक्के सदस्य कामगिरी पाहून कमी करण्यात येतात. यंदा कर्मचाऱ्यांच्या कपातीत वाढ करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा-कोरोनाशी लढा: रुग्णालयांच्या पायाभूत सुविधांकरता 'टाटा'कडून मदत

व्यवस्थापन आणि टीममधील नेतृत्वानेही वेतनात कपात केल्याचे कंपनीने म्हटले आहे. यापूर्वी झोमॅटो, स्विग्गी, ओला, उबेर, लाईव्हस्पेस आणि शेअरचॅट कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. लेडिंगकार्टची स्थापना २०१४ ला झाली आहे. कंपनीने गुंतवणूकदारांकडून १ हजार ५० कोटी रुपयांचे भांडवल मिळविले आहे.

हेही वाचा-'केंद्र सरकारच्या आर्थिक पॅकेजमधून जीएसटीला माफी नाही'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.