ETV Bharat / business

आरोग्याचे उद्दिष्ट सांगितल्यास मिळणार भत्ता! कोटकची कर्मचाऱ्यांना ऑफर - remote working allowance by Kotak

कर्मचाऱ्यांना इंटरनेटसह इतर संपर्कयंत्रणेवर अवलंबून राहावे लागते. तसेच त्यांना आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. कर्मचाऱ्यांमध्ये 'आरोग्य आणि तंदुरुस्ती' वाढीला लागण्यासाठी भत्ता देण्यात येतात.

कोटक बँक
कोटक बँक
author img

By

Published : Dec 8, 2020, 7:22 PM IST

मुंबई - कॉर्पोरेटमध्ये कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येतात. कोटक बँकेने अशीच योजना कर्मचाऱ्यांसाठी सुरू केली आहे. जे कर्मचारी महिन्याचे आरोग्याचे उद्दिष्ट कळवतील, त्यांना कंपनीकडून तंदुरुस्तीचा भत्ता दिला जणार आहे.

जे कर्मचारी घरातून काम करतात, त्यांनाही कोटक बँकेकडून 'रिमोट वर्किंग अलाउन्स' भत्ता दिला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे अनेक कर्मचारी मार्चपासून घरातून पूर्णवेळ किंवा अर्धवेळ काम करतात. अशा कर्मचाऱ्यांना इंटरनेटसह इतर संपर्कयंत्रणेवर अवलंबून राहावे लागते. तसेच त्यांना आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. कर्मचाऱ्यांमध्ये 'आरोग्य आणि तंदुरुस्ती' वाढीला लागण्यासाठी भत्ता देण्यात येतात.

हेही वाचा-कराड जनता बँकेचा परवाना रद्द; आरबीआयची कारवाई

कोटक ग्रुपच्या मनुष्यबळ विभागाचे अधिकारी सुखजीत पसरिचा म्हणाले, की नवीन सामान्यस्थिती नवीन आव्हाने निर्माण झाली आहेत. घरातून काम करण्याच्या स्थितीत काम आणि जीवन यामध्ये संतुलन ठेवावे लागते. त्याचा कर्मचाऱ्याच्या शारीरिक आणि भावनिक स्थितीवर परिणाम होतो.

हेही वाचा-सलग चौथ्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा नवा उच्चांक; १८२ अंशाने वधारला निर्देशांक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.