ETV Bharat / business

किया मोटर्स देशात घेणार सोनेट मॉडेलचे उत्पादन; जगभरात करणार निर्यात - Sonet production in India

किया मोटर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कुखिम शिम म्हणाले, की सेल्टोज आणि कार्निव्हलच्या यशानंतर कंपनीला भारतीय बाजारपेठेबाबत आत्मविश्वास आहे. सोनेट हे मॉडेल महत्त्वाकांक्षी ग्राहकांच्या गरजा पूर्तता करेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

सोनेट
सोनेट
author img

By

Published : Aug 7, 2020, 7:26 PM IST

नवी दिल्ली – किया मोटर्स कॉर्पोरेशनने सोनेट हे एसयूव्ही श्रेणीमधील मॉडेल आज जगभरात लाँच केले आहे. हे मॉडेल देशात पुढील महिन्यात उपलब्ध होणार आहे.

किया मोटर्सच्या सोनेट मॉडेलचे उत्पादन हे आंध्रप्रदेशमधील अनंतपूरच्या कारखान्यात घेतले जाणार आहे. त्यानंतर इतर देशांमध्ये वाहनांची निर्यात करण्यात येणार आहे. किया मोटर्सचे सेल्टोज आणि कार्निव्हल या चारचाकीनंतर सोनेट हे देशातील तिसरे चारचाकीचे उत्पादन ठरणार आहे. त्यामुळे किया मोटर्स ह्युदांईची व्हेन्यू, मारुतीची विस्तारा ब्रेझ्झा, टाटा नेक्सॉन आणि महिंद्रा एक्सयूव्ही 300 या चारचाकींबरोबर स्पर्धा करू शकणार आहे.

किया मोटर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कुखिम शिम म्हणाले, की सेल्टोज आणि कार्निव्हलच्या यशानंतर कंपनीला भारतीय बाजारपेठेबाबत आत्मविश्वास आहे. सोनेट हे मॉडेल महत्त्वाकांक्षी ग्राहकांच्या गरजा पूर्तता करेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

सोनेट हे 1.2 लिटर आणि 1 लिटर टर्बो पेट्रोलच्या श्रेणीत उपलब्ध होणार आहेत. तर 1.5 लिटरच्या डिझेल श्रेणीतही उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, किया मोटर्सने एका वर्षात 1 लाख चारचाकींच्या विक्रीचा टप्पा गाठला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.