नवी दिल्ली - दक्षिण कोरियाची वाहन कंपनी कियाने कंपनीचे नाव बदलले आहे. किया मोटर्सऐवजी किया इंडिया असे नाव कंपनीने बदलले आहे.
किया मोटर्सने नवीन ब्रँडची ओळख तयार करण्यासाठी कंपनीचे नाव बदलले आहे. त्यामधून कंपनी केवळ वाहनांमध्येच नाही तर शाश्वत मोबिलिटी सोल्यूशन्समध्ये कंपनी गुंतवणूक करत असल्याचे दर्शविते.
हेही वाचा-सिप्ला 'या' औषधाची करणार विक्री; मृत्यूदर कमी होत असल्याचा दावा
कियाने पूर्वीच्या नावामधील मोटर्सचे नाव वगळले आहे. कंपनी व्यवहार मंत्रालयाने संमती दिल्यानंतर कंपनी ही किया इंडिया प्रा. लि. या नवीन कॉर्पोरेट ओळखीनुसार काम करणार आहे. कंपनीने नावासह लोगोमध्येही बदल केला आहे. आंध्रप्रदेशमधील अनंतपूर उत्पादन प्रकल्पासह विविध उत्पादन प्रकल्पस आणि डीलरशीपमध्ये कंपनीच्या बदललेल्या नावाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे वाहन कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-सार्वभौम सुवर्णरोखे खरेदी करण्याची आहे संधी; जाणून घ्या, सविस्तर माहिती
वाहन विक्रीचा सर्वात कमी वेळेत गाठला टप्पा
- चालू वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने नवीन कॉर्पोरेट लोगो आणि जागतिक ब्रँड स्लोगन लाँच केला आहे.
- कंपनीला नव्याने ब्रँड बाजारात सादर करायचा आहे.
- कंपनीचा नवीन लोगो दक्षिण कोरियामधील इनशिऑनमध्ये लाँच केला होता.
- किया इंडियाकडून दीड वर्षांपासून वाहनांची विक्री करण्यात येत आहे.
- कंपनी वाहन विक्रीत देशात चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर सर्वात कमी वेळेत 2 लाख 50 हजार चारचाकींची विक्री करण्याची कामगिरीही किया इंडियाने केली आहे.