नवी दिल्ली- देशातील उत्पादन क्षेत्रात मे महिन्यात मोठी घसरण झाली आहे. मे महिन्यात उद्योग बंद राहिल्याने व नव्या ऑर्डर मिळाल्या नसल्याने उत्पादनक्षेत्रात ही घसरण झाली आहे.
आयएचएस मर्किट इंडिया इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय इंडेक्स) निर्देशांक हा मे महिन्यात 30.48 राहिला आहे. तर हा निर्देशांक एप्रिलमध्ये 27.4 होता.
हा उत्पादनाचा निर्देशांक हा सलग 32 महिने वृद्धी दर नोंदवून एप्रिलमध्ये घसरला आहे.
अलीकडील पिएम आय डाटा हा मे महिन्यात उत्पादनाची घसरण झाल्याचे सूचित करत असल्याचे आयएचएम मर्किटचे अर्थतज्ज्ञ इलियट केर यांनी म्हटले आहे.
मागणी घटल्याने एप्रिलमध्ये उत्पादनात घसरण झाल्याचे पी आय एम सर्वेक्षणात नमूद केले आहे. गेल्या 15 वर्षात उत्पादन क्षेत्राने सर्वात वेगाने कर्मचारी कपात केली आहे.
मे महिन्यात अधिक घसरण झाल्यानंतर कोणाच्या संकटातून सावरण्याचे उद्योगासमोर मोठे आव्हान असल्याचे दिसून येत आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेली महामारी पाहता मागणीबाबत निश्चितता आहे.
असे असले तरी पुढील एक वर्षाचा विचार करता भारतीय उत्पादन क्षेत्र आशादायी असल्याचे अहवालात म्हटले आहे.