नवी दिल्ली - तुम्ही बँकेचे डेबिट कार्ड वापरत असाल तर ही उपयुक्त बातमी आहे. आयसीआयसीआय बँकेने डेबिट कार्डशिवाय पैसे काढता येऊ शकणाऱ्या एटीएम सेवेची आज सुरुवात केली आहे. या एटीएममधून जास्तीत जास्त २० हजार रुपये काढता येतात.
डेबिट कार्डशिवाय पैसे काढता येणार असल्याने ग्राहकांना कार्ड बाळगण्याची चिंता करावी लागणार नाही. ग्राहकांना 'आयमोबाईल' या अपमधून पैसे काढण्याची विनंती करावी लागणार आहे. आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक अनुप बागची म्हणाले, बँक आधुनिक तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणार आहे. टच पाँईटस ग्राहकांना अधिक सोयीचे असतील, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा-'आयएमएफ आणि गीता गोपीनाथ यांनी सरकारच्या हल्ल्यासाठी तयार व्हावे'
आयसीआयसीआय बँकेने सप्टेंबरपर्यंत १२ लाख ८८ हजार १९० कोटींचा महसूल मिळविला आहे. आयसीआयसीआय बँक सध्या १५ देशात सेवा देत आहे.
हेही वाचा-झोमॅटोची उबेर इट्सवर मात; खरेदी केला भारतामधील संपूर्ण हिस्सा