नवी दिल्ली - ह्युदांई मोटर इंडिया ही वाहन कंपनी फ्रेंच कंपनी एअर लिक्विड मेडिकल सिस्टिमसबरोबर व्हेटिंलेटरचे उत्पादन आणि वितरण करणार आहे. पहिल्या टप्प्यात १ हजार व्हेटिंलेटर तयार करण्याचे ह्युदांईने उद्दिष्ट निश्चित केले आहे.
ह्युदांई मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक एस. एस. किम म्हणाले, की व्हेटिंलेटर आणि इतर श्वसनाला आवश्यक असणारी साधने कोरोनाच्या लढ्यात महत्त्वाची आहेत. भारतात व्हेटिंलेटरचा पुरेसा होण्यासाठी ह्युदांईने एअर लिक्विड मेडिकल सिस्टिमबरोबर (एएलएमएस) काम करणार आहे.
हेही वाचा-कोरोनाच्या संकटात संधी शोधणाऱ्या चीनला बसणार पायबंद; सरकारने काढले हे आदेश
एएलएमएस इंडिया व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार म्हणाले, ह्युंदाईबरोबर आम्ही कोरोनाच्या लढाईत सकारात्मक बदल आणू, याचा आम्हाला विश्वास आहे. व्हेटिंलेटरच्या उत्पादनात संशोधन आणि विकास करणाऱ्या मोजक्या कंपनीपैकी एएलएमएस कंपनी आहे.
हेही वाचा-प्राप्तिकर विभागाकडून लहान व्यवसायिकांना १० हजार ७७९ कोटींचा कर परतावा
फुफ्फुसामधून पुरेशा क्षमतेने रुग्णाला श्वास घेता येत नसेल तर व्हेटिंलेटरचा वापर करण्यात येतो. कोरोनाच्या रुग्णाला श्वसन करताना अडथळा येताना व्हेटिंलेटरचा वापर अत्यावश्यक असतो.