ETV Bharat / business

मारुतीपाठोपाठ ह्युंदाईकडून मोफत सेवेसह वॉरंटीच्या कालावधीत वाढ

ह्युंदाई मोटर इंडियाने कोरोनाच्या कठीण काळात वाहन मालकांना दिलासा देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचप्रकारे वॉरंटी व मोफत सेवेमध्ये दोन महिन्यांनी वाढ केली आहे. कठीण काळात कंपनी ग्राहकांना मदत करत राहणार आहे.

ह्युंदाई
ह्युंदाई
author img

By

Published : May 15, 2021, 10:26 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ह्युदांई मोटर इंडियाने मोफत सेवा आणि वॉरंटीमध्ये दोन महिन्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात ज्यांना वाहनाची सर्व्हिस घेतली नाही, त्यांना दिलासा मिळणार आहे.

ह्युंदाई मोटर इंडियाने कोरोनाच्या कठीण काळात वाहन मालकांना दिलासा देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचप्रकारे वॉरंटी व मोफत सेवेमध्ये दोन महिन्यांनी वाढ केली आहे. कठीण काळात कंपनी ग्राहकांना मदत करत राहणार आहे. तर ग्राहकांना २४X७ आपत्कालीन स्थितीत मदत करण्यात येणार असल्याचे ह्युंदाईने म्हटले आहे.

हेही वाचा-सिम्पल एनर्जी ऑगस्टमध्ये करणार ई-स्कूटर लाँच; जाणून घ्या, वैशिष्ट्ये

नुकतेच देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी, टोयोटा किर्लोस्करने वाहन मालकांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. या वाहन कंपन्यांनी वाहनांची मोफत सेवा (सर्व्हिस) आणि वॉरंटी कालावधी वाढविला आहे. कोरोना महामारीमुळे वाहन कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा-कोव्हॅक्सिनचे दर महिन्याला १० कोटींहून अधिक होणार उत्पादन; तीन सार्वजनिक कंपन्यांबरोबर करार

टाटा मोटर्सनेही वॉरंटीला दिली मुदतवाढ

यापूर्वी टाटा मोटर्सने वाहनांच्या वॉरंटी आणि मोफत सेवेला ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या वाहनांची वॉरंटी व मोफत सेवेची मुदत १ एप्रिल ते ३१ मेपर्यंत संपणार आहे, त्याच वाहनांना मुदतवाढ मिळणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.