बीजिंग - चीनची टेक कंपनी हुवाईने स्मार्टफोनचे उत्पादन ६० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षात ७० ते ८० दशलक्ष स्मार्टफोनसाठी सुट्ट्या भागांची ऑर्डर करणार आहे.
हुवाईने २०२० मध्ये १८९ दशलक्ष स्मार्टफोनची निर्यात केली होती. तर त्यापूर्वी २४० दशलक्ष स्मार्टफोनची निर्यात केली होती. कंपनी चालू वर्षात न्यू मेट एक्स२ सोबत फोल्डेबल स्मार्टफोन सक्सेसर लाँच करणार आहे. हुवाई ही गेमिंग श्रेणीत गेमिंग नोटबुक आणि स्वत:चे गेमिंग कन्सोल लाँच करण्याचे नियोजन करत आहे. मेटस्टेशन नावाने गेमिंग कन्सोल लाँच होणार आहे. तसेच नवीन लॅपटॉपही कंपनी लाँच करू शकते. नुकतेच अमेरिकेने हुवाईवरील व्यापाराची निर्बंध हटविण्याचे कोणतेही कारण नसल्याचे म्हटले होते.
हेही वाचा-आरबीआयचे डेक्कन अर्बन बँकेवर निर्बंध; केवळ हजार रुपये काढता येणार
असा असेल फोल्डेबल स्मार्टफोन
स्मार्टफोनची घडी होऊ शकणारे (फोल्डेबल) मॉडेल हा वापरकर्त्यांसाठी आकर्षण बिंदू ठरला आहे. सॅमसंगने फोल्डेबल स्मार्ट लाँच केल्यानंतर हुवाईही २२ फेब्रुवारीला फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन ओरिजनल मेट एक्ससारखा दिसायला असण्याची शक्यता आहे.हुवाईचा मेट एक्स २ या फोल्डेबल स्मार्टफोनची डिझाईन ही सॅमसंग गॅलक्सी फोल्डसारखी असण्याची शक्यता आहेत. म्हणजे हा फोल्डेबल स्मार्टफोन हा बाहेर नाही तर, आतमध्ये दुमडू शकणार आहे.
हेही वाचा-बिटकॉनची जगभरातील बाजारपेठ पोहोचली ७२.७३ लाख कोटी रुपयांवर!