नवी दिल्ली - कोरोना महामारीतही हिरो इलेक्ट्रिकने वाहन विक्रीत चांगले यश मिळविले आहे. हिरो इलेक्ट्रिकने २०२० मध्ये एकूण ५० हजार इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री केली आहे.
हिरो इलेक्ट्रिक कंपनीच्या वाहन विक्री केंद्राची संख्या ५०० हून अधिक झाली आहे. यामध्ये ५०० हून लहान शहरांसह इतर मोठ्या शहरांचा समावेश आहे. हिरो इलेक्ट्रिकचे सेवेचे देशात सर्वात मोठे जाळे आहे. हिरो इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोहिंद्र गिल म्हणाले की, आपण अत्यंत आव्हानात्मक स्थितीला सामोरे जात आहोत. आम्ही जे मिळविले आहे, त्याबाबत आम्हाला अत्यंत अभिमान आहे.
हेही वाचा-देशाच्या निर्यातीत १ ते १४ मार्चदरम्यान १७ टक्क्यांची वाढ
वाहनांच्या उत्पादनांची वार्षिक क्षमता २.५ लाख करण्याचा प्रयत्न-
नवीन उत्पादने सादर करण्यासाठी आम्ही खूप उत्साही आहोत, असे गिल यांनी म्हटले आहे. लुधियानामधील प्रकल्पामधून वाहनांच्या उत्पादनांची वार्षिक क्षमता ७० हजार आहे. तर चालू वर्षात ही क्षमता वार्षिक २.५ लाख करण्याचा प्रयत्न आहे. चालू आर्थिक वर्षात कंपनीने विकासदर १५ टक्के गाठण्याचे निश्चित केले आहे. वर्षभरात कंपनीने हायब्रीड सेल्स मॉडेल, ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून वाहनांची विक्री केली आहे. कंपनीने देशात २०२०-२१ मध्ये विविध शहरांमध्ये १,५०० नवीन चार्जिंग सेंटर सुरू केले आहेत.
हेही वाचा-वित्तीय कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण ; शेअर बाजारासह निफ्टीला किंचित फटका