ETV Bharat / business

मैलाचा दगड : एचडीएफसीने ओलांडला 7 लाख कोटींच्या भांडवली मूल्याचा टप्पा - Reliance Industries

एचडीएफसीच्या प्रति शेअरची किंमत ही सकाळी 11 वाजून 25 मिनिटाला 1 हजार 278 रुपये 90 पैसे एवढी होती. हे शेअर 0.41 टक्क्यांनी वधारले होते.

संपादित - एचडीएफसी बँक
author img

By

Published : Nov 15, 2019, 2:56 PM IST

Updated : Nov 15, 2019, 3:27 PM IST

मुंबई - देशामधील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसीने भांडवली मूल्यात 'मैलाचा दगड' गाठला आहे. एचडीएफसी ही ७ लाख कोटी रुपयांहून अधिक भांडवली मूल्य असलेली तिसरी कंपनी ठरली आहे. यापूर्वी टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजने हा टप्पा ओलांडला आहे.

एचडीएफसीच्या भांडवली मूल्याची आज 7,00,252.30 कोटी रुपये एवढी नोंद झाली आहे. रिलायन्स ही भांडवली मूल्य असलेली देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. रिलायन्सचे भांडवली मूल्य हे 9,39,463.36 कोटी रुपये आहे. तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे भांडवली मूल्य हे 8,25,168.16 कोटी रुपये आहे.

हेही वाचा-व्यापार करार : अमेरिकेचे प्रतिनिधी पुढील आठवड्यात येणार भारताच्या दौऱ्यावर

एचडीएफसीच्या प्रति शेअरची किंमत ही सकाळी 11 वाजून 25 मिनिटाला 1 हजार 278 रुपये 90 पैसे एवढी होती. हे शेअर 0.41 टक्क्यांनी वधारले होते.

भांडवली मूल्य म्हणजे काय ?
भांडवली मूल्य = कंपन्यांचे एकूण असलेले शेअर X एका शेअरची किंमत

जसे कंपनीच्या शेअरचे मूल्य बदलते. तसेच भांडवली मूल्य बदलते. शेअरची किंमत अथवा संख्या वाढली तर भांडवली मूल्य वाढते.

Intro:Body:

Dummy Business News

Conclusion:
Last Updated : Nov 15, 2019, 3:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.