बंगळुरू - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर कपातीचा निर्णय घेतल्याने बायॉकॉनचे चेअरमन किरण मुझुमदार-शॉ यांनी त्यांचे कौतुक केले आहे. दोन दिवसापूर्वी मुझुमदार-शॉ यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांवर ट्विटवरून निशाणा साधला होता.
किरण मुझुमदार-शॉ यांनी ट्विट करत जीएसटी कपातीवर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हटले आहे ट्विटमध्ये-
आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी कॉर्पोरेट कर हा ३० टक्क्यावरून २५.२ टक्के करण्यात आला आहे. हा गुंतवणुकीला चालना देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. गरज असलेल्या धाडसी निर्णयासाठी त्यांना सलाम!
हेही वाचा-एकाच दिवसात शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या भांडवली मूल्यात ७ लाख कोटींची भर!
अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रीय वित्तमंत्रालय काय आर्थिक सुधारणा जाहीर करणार आहे, असे ट्विट मुझूमदार-शॉ यांनी गुरुवारी केले होते. त्याला उत्तर देत सीतारामन यांनी सरकार आर्थिक सुधारणांची घोषणा करत असल्याचे म्हटले होते.
हेही वाचा-ई-सिगरेट बंदीच्या घोषणेवरून किरण मुझुमदार शॉ यांचा आक्षेप; सीतारामन यांनी 'हे' दिले उत्तर
मणिपाल ग्लोबल एज्युकेशनचे चेअरमन आणि इन्फोसिसचे माजी संचालक टी.व्ही.मोहनदास पै यांनी कॉर्पोरेट कर कपातीचा निर्णय हा ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. खरोखर ऐतिहासिक!अभिनंदन कॉर्पोरेट करात कपात कमी केल्याने मेक इन इंडियाला चालना मिळेल, असा त्यांनी ट्विट करत विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा-जीएसटी परिषद: सरकारकडून कॉर्पोरेटला दिवाळी भेट; 'अशी' मिळणार कर सवलत