ETV Bharat / business

डिजीटल भारताच्या बांधणीकरिता गुगलचा माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाबरोबर करार

गुगलच्या उपक्रमामधून  विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन शिकता येणार आहे. यामध्ये मशिन लर्निंग, क्लाऊड आणि अँड्राईडच्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे. संरचना, रणनीती आणि तंत्रज्ञान या विषयावरच्या मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

रविशंकर प्रसाद यांच्यासमेत गुगलचे अधिकारी
author img

By

Published : Aug 31, 2019, 6:48 PM IST

नवी दिल्ली - डिजीटल भारताच्या बांधणीसाठी गुगलने केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाबरोबर केला आहे. या कार्यक्रमात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना बाजारानुरुप, तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प तयार करता येणार आहेत. त्यामधून सामाजिक समस्या सोडविण्यास हातभार लागेल, असे गुगलने म्हटले आहे.

देशभरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून आरोग्य, कृषी, शिक्षण, स्मार्टसिटीज, पायभूत क्षेत्र, स्त्रियांचे सुरक्षितता, स्मार्ट मोबिलिटी, वाहतूक, पर्यावरण आणि डिजीटल साक्षरता आदी विषयांवरील कल्पना आणि उपाय मागविण्यात येणार आहेत. गुगलच्या उपक्रमामधून विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन शिकता येणार आहे. यामध्ये मशिन लर्निंग, क्लाऊड आणि अँड्राईडच्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे. संरचना, रणनीती आणि तंत्रज्ञान या विषयावरच्या मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

उपक्रमामधून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रेरणा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सामाजिक प्रश्नावर उपाययोजना शोधण्यासाठी चांगल्या तंत्रज्ञानाचा पर्याय देण्यात येणार असल्याचे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशकंर प्रसाद यांनी सांगितले.

गुगलच्या 'सरकार व्यवहार आणि सार्वजनिक धोरण विभागा'चे करण भाटिया म्हणाले, मशिन लर्निंग आणि कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेने कठीण सामाजिक प्रश्न सुटू शकणार आहेत. पुढे ते म्हणाले, सरकारबरोबर भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. तरुण अभियंत्यांना तांत्रिक आणि आंत्रेप्रेन्युअर कौशल्याची प्रेरणा देणे आणि सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यांच्या अभिनव कल्पना भविष्यात आणण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Intro:Body:

state

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.