ETV Bharat / business

फ्लिपकार्टपासून विलग होत फोनपे होणार स्वतंत्र कंपनी; 5,172 कोटींचे भांडवल तयार

फोनपेने लक्षणीय प्रगती केली आहे. अशा वेळी फोनपेमध्ये येत्या दोन ते चार वर्षांपर्यंत स्वतंत्र महत्त्वाकांक्षीपणे गुंतवणूक करण्याचे फ्लिपकार्टच्या संचालक मंडळाने निश्चित केले आहे.

फोनपे
फोनपे
author img

By

Published : Dec 3, 2020, 3:39 PM IST

Updated : Dec 3, 2020, 4:19 PM IST

नवी दिल्ली - ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट कंपनीने फोनपे ही स्वतंत्र होणार असल्याची घोषणा केली आहे. डिजीटल देयक व्यवहारात असलेली फोनपेने वॉलमार्टसह इतर गुंतवणुकदारांकडून सुमारे ५,१७२ कोटी रुपयांचे भांडवल उभे केले आहे.

विलग झाल्यानंतरही फोनपेमध्ये फ्लिपकार्टचा सर्वाधिक हिस्सा राहणार आहे. दोन्ही कंपन्यांच्ये व्यवसाय एकमेकांच्या सहकार्याने चालणार आहेत. फोनपेने लक्षणीय प्रगती केली आहे. अशा वेळी फोनपेमध्ये येत्या दोन ते चार वर्षांपर्यंत स्वतंत्र महत्त्वाकांक्षीपणे गुंतवणूक करण्याचे फ्लिपकार्टच्या संचालक मंडळाने निश्चित केले आहे.

हेही वाचा-फ्लिपकार्ट लखनौमध्ये सुरू करणार ५० हजार स्क्वेअर फुटांचे गोदाम; ५०० जणांना नोकऱ्या

फोनपेचा डिजीटल व्यवहारात आहे मोठा हिस्सा

  • फोनपेचे २५० दशलक्षहूनअधिक ग्राहक आहेत.
  • दर महिन्याला १०० दशलक्षहून अधिक सक्रिय ग्राहक आहेत.
  • ऑक्टोबर २०२० मध्ये फोनपेवरून १ अब्ज डिजीटल देयक व्यवहार झाले आहेत.

फोनपेचे संस्थापक आणि सीईओ समीर निगम म्हणाले, की फ्लिपकार्ट आणि फोनपे हे भारतीय डिजीटल माध्यमांत आघाडीवर आहेत. प्रत्येकी कंपन्यांमध्ये २५० दशलक्ष वापरकर्ते आहेत.

हेही वाचा-सणाच्या तोंडावर अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टची मनसेकडून कोंडी; 'हा' दिला इशारा

फ्लिपकार्टचे सीईओ कल्याण कृष्णमुर्ती म्हणाले, की फ्लिपकार्ट स्वतंत्र केल्याने त्याची क्षमता जास्तीत जास्त वापरता येणार आहे. तसेच फ्लिपकार्टला समभागधारकांसाठी जास्तीत जास्त मूल्यनिर्मिती करता येणार आहे.

फोनपेची २०१६ मध्ये स्थापना-

फोनपेची स्थापना फ्लिपकार्टचे माजी कार्यकारी निगम, राहुल छारी आणि बर्झिन इंजिनियर यांनी २०१६ मध्ये स्थापना केली. फ्लिपकार्टसह फोनपे ही वॉलमार्टने अधिग्रहित केली आहे.

Last Updated : Dec 3, 2020, 4:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.