सॅनफ्रान्सिस्को- अॅमेझॉनच्या पाच महिला कर्मचाऱ्यांनी वंश, लिंग आदी कारणांनी भेदभाव होत असल्याचा आरोप करत कंपनीला न्यायालयात खेचले आहे. या महिला कर्मचारी कंपनीमध्ये गोदोम व्यवस्थापनाच्या कामात मोठ्या पदावर कार्यरत आहेत.
अॅमेझॉनविरोधात अमेरिकेच्या विविध जिल्हा न्यायालयात पाच महिलांनी खटले दाखल केले आहेत. या महिला २० ते ६० वर्षांमधील आहेत. श्वेतवर्षीय व्यवस्थापकाकडून वंश, लिंग आणि लैंगिक छळ होत असल्याची तक्रार या महिला कर्मचाऱ्यांनी केली आहे. न्यायालयात खटला दाखल केलेल्या पाचपैकी दोन महिला कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली आहे. तर तीन महिला कर्मचारी अजूनही कंपनीत काम करत आहेत. अॅमेझॉनच्या प्रवक्त्याने कंपनीकडून तक्रारीबाबत तपास सुरू असल्याचे सांगितले.
हेही वाचा-अॅमेझॉन इंडियाचे वेबसाईटसह अॅप दोन तास पडले बंद; ग्राहकांना त्रास
भेदभाव आणि कोणत्याही प्रकारचा छळाला थारा नाही-
महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या दाव्याबाबत पुरावा आढळलेला नाही. अॅमेझॉनही विविधता, समानता आणि सर्वसमावेशक संस्कृतीला चालना देण्यासाठी परिश्रम करत आहे. आम्ही कर्मचाऱ्यांमधील भेदभाव आणि कोणत्याही प्रकारचा छळ सहन करत नाही. तसे व्यवस्थापनातील कोणत्याही व्यक्तीच्या चुकीच्या वागणुकीविरोधात अज्ञात नावाने तक्रार करावी, असेही प्रवक्त्याने म्हटले आहे.
हेही वाचा-ईपीएफओकडून विमा संरक्षणात वाढ; ७ लाखापर्यंत मिळणार रक्कम
दरम्यान, अॅमेझॉनचे समभागधारक पुढील आठवड्यात कंपनीचे धोरण आणि नागरी हक्क, समानता आदी विषयांवरील कामाची पद्धत यावर मतदान करणार आहेत.