ETV Bharat / business

'या' दोन बँका येस बँकेत करणार प्रत्येकी ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक

भारतीय रिझर्व्ह बँकेने येस बँकेचे बुधवारी (१८ मार्च) तात्पुरते निर्बंध काढल्यानंतर नवीन जबाबदारी घेणार असल्याचे प्रशांत कुमार यांनी सांगितले. या व्यतिरिक्त येस बँकेच्या संचालक मंडळाचे अकार्यकारी संचालक म्हणून महेश कृष्णमूर्ती आणि अतुल भेडा हे कार्यरत राहणार आहेत.

Yes bank
येस बँक
author img

By

Published : Mar 14, 2020, 7:55 PM IST

नवी दिल्ली - आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेत आणखी दोन बँका गुंतवणूक करणार आहेत. येस बँकेचे ३०० कोटी रुपयांचे ३० कोटी शेअर फेडरल बँक खरेदी करणार आहे, तर बंधन बँकही तेवढीच म्हणजे ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने येस बँकेचे बुधवारी (१८ मार्च) तात्पुरते निर्बंध काढल्यानंतर नवीन जबाबदारी घेणार असल्याचे प्रशांत कुमार यांनी सांगितले. या व्यतिरिक्त येस बँकेच्या संचालक मंडळाचे अकार्यकारी संचालक म्हणून महेश कृष्णमूर्ती आणि अतुल भेडा हे कार्यरत राहणार आहेत. केंद्र सरकारने येस बँकेच्या फेररचना आराखड्याच्या योजनेला शुक्रवारी मंजुरी दिली. या आराखड्यानुसार स्टेट बँक ऑफ इंडिया येस बँकेत किमान ४९ टक्के हिस्सा विकत घेवू शकणार आहे. तर किमान तीन वर्षापर्यंत स्टेट बँकेला येस बँकेमधील २६ टक्के हिस्सा विकता येणार नाही.

हेही वाचा-कोरोनाने पर्यटन क्षेत्राची दमछाक; उद्योगाची दिलासा देण्याची सरकारकडे मागणी

या बँकाही येस बँकेमध्ये करणार आहेत गुंतवणूक-

येस बँकेवरील आर्थिक संकट दूर करण्यासाठी एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक यांनी पुढाकार घेतला आहे. येस बँकेत १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. तर कोटक महिंद्रा बँकेने येस बँकेत ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. एचडीएफसी बँक येस बँकेचे १००० कोटी रुपयांचे शेअर प्रति १० रुपयांनी विकत घेणार आहे. यापूर्वीच आयसीआयसीआय बँकने येस बँकेत १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे. तर अ‌ॅक्सिस बँकेने येस बँकेत ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे म्हटले आहे. स्टेट बँकेच्या संचालक मंडळाने येस बँकेचे ७ हजार २५० कोटी रुपयांचे शेअर खरेदी करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे.

हेही वाचा-जीएसटी १२ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर.. मोबाईलच्या किमती वाढणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.