ETV Bharat / business

डीएचएलएफकडून नवीन गुरुग्रामधील जमिनीची विक्री; प्रति एकरचा दर ऐकून व्हाल थक्क!

खरेदी केलेल्या जमिनीवर अमेरिकन एक्सप्रेसकडून मोठा कॅम्पस विकसित केला जाणार आहे. हा परिसर 'सेक्टर ७४ ए'मध्ये आहे. त्याला न्यू गुरूग्राम म्हणूनही ओळखले जाते.

संग्रहित- डीएचएलएफ
author img

By

Published : Sep 16, 2019, 3:07 PM IST

नवी दिल्ली - स्थावर मालमत्ता क्षेत्रामधील मोठी कंपनी डीएलएफने नवीन गुरुग्राममधील ९ एकर जमीन अमेरिकन एक्सप्रेसला विकली आहे. या जमिनीला परिसरात आजपर्यंत सर्वात अधिक म्हणजे सुमारे ३२ कोटी रुपये प्रति एकर अशी किंमत मिळाली आहे.

खरेदी केलेल्या जमिनीवर अमेरिकन एक्सप्रेसकडून मोठा कॅम्पस विकसित केला जाणार आहे. हा परिसर 'सेक्टर ७४ ए'मध्ये आहे. त्याला न्यू गुरूग्राम म्हणूनही ओळखले जाते. डीएलएफचे व्यवस्थापकीय संचालक (भाडे व्यवसाय) श्रीराम खट्टर आणि डीएलएफ ग्रुपचे सीएफओ अशोक त्यागी यांनी जमीन व्यवहार झालेल्या वृत्ताला पुष्टी दिली आहे. या व्यवहाराने दक्षिण परिसर रस्ता (एसपीआर) आणि एनएच-८ मध्ये जमिनीला मिळणाऱ्या भावाचे एक मानांकन (बेंचमार्क) तयार झाल्याचे श्रीराम खट्टर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-सौदीतील प्रकल्पावरील हल्ल्याचा 'भडका'; कच्च्या तेलाच्या दरात १० टक्के भाववाढ

येथे पायाभूत सेवा सुरू करण्यासाठी हरियाणा सरकराने खूप प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले. नवीन गुरग्राम विकसित करण्यासाठी कंपनीकडून सरकारला सर्वप्रकारची मदत करण्याची त्यांनी तयारी दर्शविली आहे. यापूर्वी गुरुग्राम विकसित करण्यासाठी डीएचएलएफने सरकारला मदत केली होती. माहिती तंत्रज्ञान शहर असलेल्या नवीन गुरुग्राममध्ये डीएलएफ काही प्रकल्प विकसित करत आहे.

हेही वाचा- घाऊक बाजारपेठेतील महागाईचा निर्देशांक ऑगस्टमध्ये 'जैसे थे', १.०८ टक्क्यांची नोंद

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.