नवी दिल्ली - खरेदी म्हटले की अनेक ग्राहक ठराविक ब्रँडच्याच वस्तुंचा आग्रह धरतात. हाच ग्राहकांचा विश्वास एका सर्व्हेतून तपासण्यात आला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. देशातील पहिल्या ७ विश्वसनीय ब्रँडमध्ये केवळ जीवन विमा महामंडळाला (एलआयसी) स्थान मिळविता आले आहे. एलआयसी तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर लॅपटॉप तयार करणारी डेल आहे.
विश्वसनीय ब्रँडमध्ये ऑटोमोबाईल कंपनी जीप दुसऱ्या क्रमांकावर आहे. ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन चौथ्या तर अॅपलच्या आयफोनने पाचवे स्थान विश्वसनीय ब्रँडमध्ये मिळविले आहे.
टाटाचे सर्वात अधिक २३ ब्रँड विश्वसनीय-
सर्वे करण्यात आलेल्या आघाडीच्या एकूण १००० ब्रँडमध्ये टाटाचे सर्वात अधिक २३ ब्रँड विश्वसनीय ठरले आहेत. त्यानंतर गोदरेजचे १५ तर अमुलच्या ११ ब्रँडला ग्राहकांनी विश्वसनीय म्हणून पसंत केले आहे. तर सॅमसंगच्या ८ ब्रँडनेदेखील या यादीत स्थान मिळविले आहे. देशातील १ हजार विश्वसनीय ब्रँडपैकी सर्वात अधिक अन्न आणि शीतपेय तसेच दैनंदिन लागणाऱ्या वस्तुंचे ब्रँड आहेत. टीआरए संशोधन संस्थेने १६ देशांतील २ हजार ३१५ लोकांना प्रश्न विचारून ब्रँड सर्व्हे केले आहेत. त्यातून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.