नवी दिल्ली - मुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी दुरुस्तीमुळे बंद आहे. याचा परिणाम म्हणून दिल्ली-मुंबई मार्गावरील विमान फेऱ्यांची संख्या कमी झाली आहे. नेहमीप्रमाणे होणारी विमान उड्डाणे कमी झाल्याने विमान तिकिटांच्या दरात वाढ झाली आहे.
मेक माय ट्रीपच्या वेबसाईटप्रमाणे १५ नोव्हेंबरसाठी दिल्ली-मुंबईच्या विमान तिकिटाचा दर हा ३ ते ३ हजार ५०० रुपये आहे. हा तिकिट दर गोएअर आणि स्पाईसजेट विमानांचा आहे. मुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्ट बंद राहिल्याने विमान उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत. त्याचा परिणाम म्हणून विमान तिकिटांचे दर अंशत: वाढल्याचे विमान कंपनीतील अधिकाऱ्याने सांगितले.
दिल्ली-मुंबई मार्गावरील सुमारे १० टक्के विमान उड्डाणांची संख्या कमी झाली आहे. मागणी कमी असल्याने आसनक्षमता अजूनही शिल्लक आहे. या कारणाने तिकिटांचे दर वाजवी आहेत. मागील वेळी तिकिटांचे दर हे २० हजार रुपयापर्यंत पोहोचले होते. यंदा तशी स्थिती नसल्याचे विमान कंपनीतील अधिकाऱ्याने सांगितले. वाढलेल्या तिकिट दराबाबत एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. विमान तिकिटाचे दर खूप सामान्य आहेत. काही प्रमाणात तिकिटांचे दर वाढले आहेत. त्याचे कारण प्रवासाचा हा चालू असलेला हंगाम (पीक सीझन) आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा-शेअर बाजाराचा पुन्हा विक्रम: निर्देशांक ४०,६७६ वर ; निफ्टीने ओलांडला १२,००० चा टप्पा