चेन्नई - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे चीनमधून भारतातआयात होणाऱ्या सुट्या भागांच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे टीव्हीएसच्या बीएस-६ इंजिन क्षमतेच्या वाहनांचे उत्पादन थंडावले आहे.
टीव्हीएस मोटर मर्यादित प्रमाणात सुट्या भागांसाठी चीनवर अवलंबून आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये घेण्यात येणारे नियोजित उत्पादन हे १० टक्क्यांनी कमी होणार आहे. लवकरात लवकर सामान्यस्थिती पूर्ववत होण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचे टीव्हीएस मोटर कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-रिअलमीचा पहिला ५जी स्मार्टफोन देशात लाँच
टीव्हीएस मोटरचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी के. एन. राधाकृष्णन म्हणाले, गेल्या महिन्यात बीएस-६ वाहनांचे कंपनीने पूर्णपणे स्थित्यंतर केले आहे.
हेही वाचा-पंतप्रधान मोदी हे 'वाटाघाटीत कठोर' असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले; यामागचा नेमका अर्थ काय?
वाहनांच्या सुट्या भागांचा भारतामधून तसेच दुसऱ्या प्रदेशामधून पुरवठा व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. दरम्यान, चीन हा वाहनांच्या सुट्या भागांची जगभरात निर्यात करणारा आघाडीचा देश आहे. मात्र, कोरोनामुळे चीनमधील वाहनांच्या सुटे भाग तयार करणारे उद्योग ठप्प झाले आहेत.