ETV Bharat / business

कोल इंडियासह सिंगरेनी माईन्समधील संपाने कोळसा उत्पादन ठप्प - भारतीय मजदूर संघ

देशातील ५ कोळसा कामगार संघटना या सीआयएल आणि सिंगरेनीमधील ५ लाखांहून अधिक कामगारांचे प्रतिनिधीत्व करतात. संपामुळे संपूर्ण उत्पादन, वाहतुकीसह इतर काम थांबण्यात आले आहे.

संग्रहित - कोळसा कामगार
author img

By

Published : Sep 24, 2019, 3:12 PM IST

कोलकाता - खाणीतील उत्पादन आणि तेथून उत्पादन पाठविणे संपूर्णपणे थांबविण्यात आल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे. या खाणी कोल इंडिया आणि सिंगरेनी माईन्सच्या असल्याचे कामगार संघटनांनी म्हटले आहे. कोळसा खाणीत १०० टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे. याला विरोध करत कामगार संघटनांनी एक दिवस संप पुकारला आहे.

देशातील ५ कोळसा कामगार संघटना या सीआयएल आणि सिंगरेनीमधील ५ लाखांहून अधिक कामगारांचे प्रतिनिधीत्व करतात. संपामुळे संपूर्ण उत्पादन, वाहतुकीसह इतर काम थांबण्यात आले आहे. यामध्ये आसाम ते सिंगरेनीमधील खाणींचा समावेश असल्याचे अखिल भारतीय कोळसा कामगार संघटनेचे महासचिव डी.डी.रामानंदन यांनी सांगितले.

एकूण उत्पादनापैकी ८० टक्के उत्पादन हे कोल इंडियाच्या खाणींमधून घेतले जाते. मात्र संपामुळे १.५ दशलक्ष टन उत्पादन ठप्प झाले आहे. कोल इंडियाच्या अधिकाऱ्यांकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही. या संपामध्ये इंडियन नॅशनल माईनवर्कर्स फेडरेशन (आयएनटीयूसी), हिंध खदान मजदूर फेडरेशन (एचएमएस), इंडियन माईनवर्कर्स फेडरेशन (एआयटीयूसी), ऑल इंडिया कोल वर्कर्स फेडरेशन (सीआयटीयू) आणि ऑल इंडिया सेंट्रल काउन्सिल ऑफ ट्रेड युनियन्सचा (एआयसीसीटीयू) समावेश आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या भारतीय मजदूर संघाने इतर कामगार संघटनांबरोबर भाग घेतला नाही. भारतीय मजदूर संघाने सोमवारपासून पाच दिवस २७ सप्टेंबरपर्यंत संप पुकारला आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.