ETV Bharat / business

कोका कोलाकडून 'हे' नवे मसालेदार उत्पादन लाँच

author img

By

Published : Jun 15, 2020, 6:28 PM IST

कोको कोला कंपनी शीतपेयांमधील विविध उत्पादनांचा विस्तार करत आहे. त्यामुळे ग्राहकांना निवडीप्रमाणे उत्पादन निवडीची संधी मिळणार आहे.

coca cola company
कोका कोला कंपनी

नवी दिल्ली – शीतपेय बनवणारी कंपनी कोको कोला इंडियाने स्थानिक गरजेप्रमाणे उत्पादने विकण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याचाच भाग म्हणून कोका कोलाने मसाला ताक बाजारात विक्रीसाठी लाँच केले आहे. या मसाला ताकाची विक्री व्हिओ (VIO) या ब्रँडच्या नावाने होणार आहे.

कोका कोलाकडून शीतपेयांच्या स्थानिक बाजारपेठेत अधिकाधिक हिस्सा मिळविण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. कंपनीचे भारतीय आणि दक्षिण आशियाचे उपाध्यक्ष सुनील गुलाटी यांनी नवीन उत्पादनाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, की स्थानिक ग्राहकांवर लक्ष केंद्रित करून नवीन उत्पादनांचे संशोधन करण्यात येत आहे. व्हिओ हे मसाला ताक लाँच करण्यामागे देशातील स्थानिक चवींचा स्वीकार करणे आहे. कंपनी शीतपेयांमधील विविध उत्पादनांचा विस्तार करत आहे. त्यामुळे ग्राहकांना निवडीप्रमाणे उत्पादन निवडीची संधी मिळणार आहे.

कोला कंपनीने व्हिओ हा ब्रँड 2016 मध्ये भारतात लाँच केला आहे. त्यामधून देशात दूध उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.